पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/383

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३७ट्रे ] नाण्याची पद्धति ही देशाच्या व्यापाराला फार हानिकर आहे असें सर्व अर्थशास्त्रकारांचें मत आहे. कारण या पद्धतीमध्यें अतिरेक व तज्जन्य अविश्वास हा उत्पन्न होतो. रोख पैसे देण्याची जबाबदारी नाहींशी झाली म्हणजे या नोटांचा अतिरेक करण्याचा मोह झाल्याखेरीज रहात नाहीं. कारण या नोटा काढण्यास खर्च मुळीच लागत नाहीं व त्यानें सरकारची तात्पुरती अडचण भागल्यासारखी होते. परंतु अशा नोटांचा अतिरेक झाला कीं त्यांची किंमत कमी होऊ लागते. कारण नोटांचें परिवर्तन बंद झालें कीं लोकांचा सरकारवरील विश्वास उडून जातो व यामुळे सरकारी चलनी नोटा लोक घ्यावयास नाखुष असतात. यामुळे त्यांची किंमत कमी होते. या नोटांवरील लोकांचा विश्वास उडाला म्हणजे त्या नोटा किती अपकृष्ट होतील याचा नियम नाहीं. नोटांच्या या अतिरेकानें पैसा देशांत फार वाढतो व पैशाच्या संख्यात्मक तत्वानुरूप पदार्थांच्या किंमती विलक्षण वाढतात व या किंमतीच्या वाढीनें व्यापारावर अनिष्ट परिणाम घडतात. फ्रान्सच्या क्रांतीच्या काळीं फ्रेंच असायनेटच्या हजारों फ्रँकांची असायनेट कांहीं पेन्सांच्या किंमतीपर्यंत अपकृष्ट झालेली होती. इंग्लंडमध्यें १७९७ पासून १८१९ पर्यंत जेव्हां अपरिवर्तनीय नोटांचा प्रसार झाला होता तेव्हां ती देशाची आणीबाणीची वेळ होती. युद्ध हें सर्व लोकांच्या संमतीनें चाललें होतें. 'लोकांचा सरकारवरील विश्वास कमी झाला नव्हता. लढाई बंद झाली म्हणजे सरकार रोख पैशाचें चलंन पुनः सुरू करील अशी लोकांना खात्री होती. तसेंच इंग्लंडचें व्यापारी वर्चस्व कायम होतें. तरी सुद्धां बँक ऑफ इंग्लंडच्या चलनी नोटा शेंकडा ५० नीं अपकृष्ट झाल्या होत्या म्हणजे त्यांची किंमत बाजारांत निम्यानें कमी झाली होती. 'वरील विवेचनावरून अपरिवर्तनीय चलनी नोटांची पद्धति स्वीकारणें एखाद्या देशाला एखाद्या आणीबाणीच्या व अडचणीच्या प्रसंगीं भाग पडलें तरी सामान्यतः ही चलनपद्धति अर्थशास्त्रदृष्ट्या अगदीं कनिष्ट दर्ज्याची आहे व अशा पद्धतीनें देशाच्या व्यापारधंद्यास उत्तेजन मिळण्याऐवजीं देशाची उद्योगधंद्याच्या बाबतींत या पद्धतीनें पीछेहाटच होते व म्हणून कोणत्याही सुधारलेल्या देशांत अशी पद्धत नेहमीची पद्धति ह्मणून स्वीकारलेली नाहीं. देशांतील धात्वात्मक नाण्याची पद्धति