पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/379

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 [ ३६७ ] असें आहे कीं, जर कडक निर्बधन नसेल तर अशा प्रसंगीं चलनी नोटांचा आतिरेक होईल. कारण व्यापा-यांना नोटांची गरज असली म्हणजे ते व्याजाचा दर जास्त देण्यास तयार होतात व या जबर व्याजाच्या मोहानें पढ्या चलनी नोटांचा अतिरेक करतील व त्यायोगानें पदार्थाच्या किंमती वाढतील, व्यापाराला सट्टयाचें स्वरूप येईल व शेवटीं नोटा अपरिवर्तनीय होऊन लोकांचा नोटांवरील विश्वास उडेल व एकंदर देशांतील पतीलाच धक्का बसेल. अशा चलनी नोटांच्या अतिरेकानें व्यापारांत मोठमोठ्या दिवाळ्यांचा काळ येऊन व्यापाऱ्यांची तारांबळ उडते. अशा प्रकारचे व्यापारी आणीबाणीचे प्रसंग इंग्लंडांत वारंवार येत व याचें कारण नोटांचा अतिरेक अशी पुष्कळ मुत्सद्द्यांची समजूत झालेली होती. इंग्लंडांतील हल्ली चालू असलेला १८४४ मधला बँक चार्टर कायदा या समजुतीवर झालेला आहे. हा कायदा सर राबर्ट पील या प्रधानाचे कारकिर्दीत पास झाला. या कायद्यान्वयें ज्या ज्या बैंकांना तो कायदा होईपर्यंत चलनी नोटा काढण्याचा अधिकार होता त्या त्या बँकांचाच फक्त आधिकार कायम करण्यांत आला. म्हणजे नव्या कोणत्याही बँकेला हा आधिकार द्यावयाचा नाहीं असें ठरले. त्याचप्रमाणें कायदा होण्यापूर्वीच्या बारा महिन्यांत जितक्या चलनी नोटा सरासरींनें चालू असतील तितक्या नोटा आपल्या मालमत्तेवर व पतीच्या जोरावर काढण्याची परवानगी मिळाली. याप्रमाणें बँक ऑफ इंग्लंडला १ कोटी ४० लक्ष रुपयांच्या चलनी नोटा काढण्याची परवानगी मिळाली व खासगी आणि संयुक्तभांडवली पेढ्यांना सर्वा मिळून ७४६०००० पैोंडांची परवानगी मिळाली. तसेंच १८४५ च्या कायद्यानें स्कॉटलंडमधील बँकांना २७५०००० पौडांची परवानगी मिळाली व आयरिश बँकांना ६३५०००० पौंडांची परवानगी मिळाली. म्हणजे एकंदर युनायटेडकिंग्डममध्यें सुमारें ३ कोटी पेोंडांच्या चलनी नोटा पेढ्यांच्या मालमत्तेच्या तारणावर काढण्याची परवानी मिळाली. यापेक्षां काढाव्या लागणा-या प्रत्येक नोटे इतकें सोनें-नाणें पेढ्यांनी आपल्या तिजोरींत ठेविलेंच पाहिजे असें या कायद्यांनीं ठरविलें. देशांतील खासगी व संयुक्तंभांडवली पेढ्यानीं जर आपला नोटा काढण्याचा अधिकार सोडून दिला तर त्यांच्या अधिकारांतील नोटांच्या रकमेच्या दोनतृतीयांश इतक्या रकमेनें बैंक ऑफ इंग्लडचा अधिकार