पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/378

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 [३६६] होय. व कागदीचलनाचा जो मूळ हेतु कीं, विशेषप्रसंगीं जास्त पैसा पाहिजे असतांना तो मिळावा तो या पद्धतीनें साधत नाहीं. परंतु काही अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणें असें आहे कीं, सरकारी कागदीचलनांत खासगी पेढ्यांचें तत्व आणणें हें फार धोक्याचें आहे. कारण त्यानें केव्हांना केव्हां तरी कागदीचलनाचे परिवर्तनाला धक्का बसेल व अपरिवर्तनीय कागदचिलनाचे अनिष्ट परिणाम देशाला भोगावयास लागतील. ह्मणून या बाबतीत चलनतत्वाचाच अवलंब केला पाहिज. तेव्हां आतां चलनतत्व म्हणजे काय हें पाहूं.

     चलनतत्ववाद्यांचें ह्मणणें असें आहे कीं, चलनी नोटांचें पूर्ण परिवर्तन राखण्याकरितां नोटाइतकें सोनें-रूपे तिजोरीत ठेवलें पाहिजे. तरच आणीबाणीच्या प्रसंगींसुद्धां लोकांना नोटांबद्द्ल केव्हांही रोखपैसे मिळतील व नोटांचें परिवर्तन पूर्ण राहील. अशा प्रकारचें कायद्याचें निबर्धन :

नसलें तर चलनी नोटांचा अतिरेक होऊन त्या नोटा अपरिवर्तनीय होतील, व असें होणें देशाच्या नुकसानीचें आहे. चलनी नोटा या इकडे तिकडे पाठविण्यास सोइस्कर, नेआण करण्यास हलक्या ह्मणून त्या उपयोगांत येतात. परंतु त्या, देशांतील कायदेशीर फेडीचें चलन असल्यामुळे त्यांची : किंमत रोख नाण्याइतकी राहिली पाहिजे, व अशी राहण्यास त्या नोटा पूर्णपणें परिवर्तनीय पाहिजेत व असें होण्यास नोटांच्या इतकें प्रत्यक्ष सोनेंनाणें तिजोरींत ठेविलें पाहिजे ह्मणजेच चलनी नोटा या ख-या प्रतिनिधीभूत पैसा राहतील.

 वरील तऱ्हेचे चलनतत्ववाद्यांचें म्हणणें आहे. यावर पेढीच्या तत्वाच्या समर्थकांचें असें उत्तर आहे की, अशा कडक निर्बंधानाने देशाला पतीचा फायदा  मिळत नाहीं. ज्यावेळीं कांहीं कारणांनीं देशांतील सोनें नाणें कमी होतें त्यावेळीं व्यापाराला पैशाची अडचण पडू नये व सर्व  उद्योगधंदे पैशाच्या अभावीं थांबू नयेत ह्मणून चलनी नोटांची खरोखरी जरूरी असते व सरकारची किंवा सरकारी आश्रयाखाली नेिघालेल्या पेढ्याची पत देशांत सर्वांमध्यें जास्त असते व ह्मणून त्यांनीं काढलेल्या चलनी नोटा लोकांमध्यें सहज प्रचलित होतात. तेव्हां या कडक चलनतत्वानें या फायद्याला देश मुकतो व ज्या वेळीं चलनाची जरूरी जास्त त्याच व्यापाप्यांना चलन मिळत नाहीं. यावर चलनतत्ववाद्यांचे प्रत्युत्तर