पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/377

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 [ ३६५ ] आहे, असें एका पक्षाचें ह्मणणें आहे; तर दुस-या पक्षाचें म्हणणें खासगी पेढ्यांना जरी हें तत्व पुरेसें असलें तरी सरकारी चलनी नोटांना व कागदी पैशाला हें तत्व पुरेसें नाहीं, तर सरकारनें चलनतत्वाचा अवलंब केला पाहिजे.

 पुढील भागांत आपल्याला पेढीच्या स्वरूपाचें व त्याच्या कार्याचें वर्णन करावयाचें आहे तेव्हां तेथें याचा विशेष खुलासा होईल. परंतु पेढीच्या तत्वाचें रहस्य इतकेंच कीं, रोजच्या व्यवहाराला जितक्या रोख रकमेची गरज लागते तितकीच रक्कम पेढीवाला आपल्या तिजोरीत ठेवतो; बाकीचें भांडवल तो व्यापा-यांस कर्जाऊ देतो. अशा करण्यानें त्याचें भांडवल बिनव्याजीं पडत नाहीं व त्यायोगें देशाच्या उद्योगधंद्यांकडे जास्त भांडवल मिळतें. कारण पेढीवाल्याच्या तिजोरींत प्रत्यक्ष पडून राहिलेले पैसे हे भांडवलाच्या दृष्टीनें निरुपयोगी असतात. तेव्हां असे पैसे जितके कमी राहतील तितके चांगले. ह्मणून पेट्टीवाला आपल्या अनुभवानें, लोकांनीं ठेवी ठेवलेल्या रकमेच्या सरासरी तृतीयांश रक्कम आपल्या तिजोरींत ठेवतो व तेवढ्यानें सर्व ठेवीवाल्यांची मागणी त्याला भागवितां येते. कारण सर्व ठेवीवाले एकसमयावच्छेदेकरून आपल्या सर्व ठेवी एकदम परत मागत नाहींत. कांहींजण पैसे परत मागतात तर कांहींजण पैसे पेढीवर ठेवण्यास येतात; सारांश, हा जसापेढीच्या व्यापाराचा अनुभव आहे, त्याचप्रमाणें सरकारी चलनी नोटांचीही स्थिति आहे. म्हणजे सर्व चलनी पैसा जवळ असलेल्या लोकांना एकसमयावच्छेदेंकरून रोख पैसा लागेल असें संभवत नाहीं. तेव्हां ज्याप्रमाणें पेढ़ीवाले ठेवीच्या रकमेच्या कांहीं प्रमाणानें रोख रुपये तिजोरींत ठेवतात; त्याचप्रमाणें सरकारनेही परिवर्तनीय कागदी चलना संबंधी केलें म्हणजे बस्स आहे. जितक्या रकमेचें कागदीचलन आहे तितक्या रकमेचे धातुरूप पेसे ठेवणें ह्मणजे देशाचें उगाच नुकसान करणें होय. कारण इतक्या पैशाची कागदीचलनाच्या पूर्ण परिवर्तनास मुळींच जरूरी नाहीं. तेव्हां पेढीच्या तत्वाच्या समर्थकांचें ह्मणणें असें आहे कीं, ज्याअर्थी कागदीचलन हे   पैशासारखें उपयोजितां येतें त्याअर्थ प्रत्यक्ष पैशाचा देशाच्या उद्योगधंद्यांच्या कामीं जितका उपयोग करतां येईल तितका करून घेतला पाहिजे व म्हणूनच कागदीचलनाइतके पैसे ठेवणें हैं निव्वळ देशाचें नुकसान करणें