पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/375

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

L३६३ ] उपयोग थेट पैशासारखा हातो. कारण शहाजोग व्यापा-याचें विनिमयपत्र बाजारांत पैशाप्रमाणें लोक मानण्यास तयार असतात. विनिमयसामान्य हे जें पैशाचें कार्य तें या पतीनें होतें ह्मणुन पत ही पैशासारखीच आहे, असें ह्मणण्यास हरकत नाहीं व अर्वाचीन काळीं कोणत्याही धंद्यास भांडवल लागतें व भांडवलाचें अत्यंतं ग्राह्यरूप ह्मणजे पैसा होय. कारण त्याच्यायोगानें हवा तो जिन्नस आपल्याला विकत घेतां येतो. यामुळे पैशाचा भांडवलासारखा उपयोग होतो व पतीचा पैशासारखा उपयोग होतो. तेव्हां पतीचाही भांडवलासारखा उपयोग होती असें म्हणण्यास हरकत नाहीं. पत ही प्रत्यक्ष भांडवल नसेल किंवा धातुरूप पैसा नसेल; परंतु त्याचा उपयोग जर वरील दोन गोष्टीसारखा होतो तर त्या गोष्टीप्रमाणेंच पतीचाही देशाच्या उद्योगवृद्धीच्या वाढीकडे उपयोग होती असें ह्मणणें भाग आहे. परंतु वर सांगितल्याप्रमाणें पत ही संपत्तिमूलक आहे हें विसरतां कामा नये. पतीला स्वतंत्र व स्वयंभू असें अस्तित्व नाहीं. जर संपत्ति किंवा धातुरूप पैसा यांचा आधार प्रथमतः नसेल तर पत ही उत्पन्न होणार नाहीं. ज्याप्रमाणें लहान लहान खांबांवर अवलंबून असलेल्या कमानींवर मोठी इमारत राहूं शकते; परंतु कमान बांधतांना प्रथमतः सर्व भिंत बांधावी लागते व एकदां कमान एकजीव झाली म्हणजे खांबांखेरीज बाकी सर्व भिंतीचा भाग काढून घेतला तरी चालतो. तीच स्थिति पतीची आहे. प्रथमतः पत होण्यास मनुष्याजवळ धातुमय पैसे व प्रत्यक्ष संपत्ति पाहिजे; परंतु एकदां बाजारांत पत बसली ह्मणजे मग खांबवजा थोडयाशा संपत्तीवर व थोड्याशा धातूंच्यापैशावर अति मोठी पत टिकू शकते व या पतीवर मग व्यापाराच्या प्रचंड घडामोडी होऊं शकतात. हें कसें होतें याचा उलगडा पुढील भागामध्यें येणार आहे. तेव्हां हा विषय येथें सध्या थांबविणें बरें.

  कायदेशीर कागदी चलन परिवर्तनीय व अपरिवर्तनीय या दोन तऱ्हेचे असतें असें कोष्टकावरून दिसेल. मागें सांगितलेंच आहे  कीं, देशाच्या औद्योगिक वाढीबरोबर नेआण करण्यासारखा व परगांवीं पोस्टानें पाठ या विण्यासारखा पैसा लोकांना पाहिजे असतो व अशा सुधारलेल्या समाजांत सरकारची पत असते व त्यांना कायद्याचाही अधिकार असतो. यामुळे कागदी चलन प्रचलित करणें हें नाण्याच्या प्रसाराप्रमाणें सरकारचेंच