पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/373

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 [ ३६१ ] प्रसार होतो. देवघेवीचे व्यवहार विराटस्वरूपी झाले ह्मणजे सोन्या-रुप्याच्या पैशाची नेआण करण्याची फार अडचण वाटू लागते. अर्थात इतर पदार्थाच्या मानानें सोन्यारुप्यामध्यें सुवाह्यता आहे खरी; तरी दहा हजार रुपये किंवा एक लाख रुपये बरोबर नेणें किंवा दुस-या गांवांत पाठविणें हें गेरसोईचें होतें. तसेंच अर्वाचीन काळीं सर्व जग हें एकच बाजार झाल्यामुळे हल्ली व्यापार जगाच्या या टोंकापासून त्या टोंकापर्यंत चालतो. अशा ठिकाणीही सोन्यारुप्याचा पैशानें व्यवहार करावयाचा असता तर फार अडचण झाली असती; परंतु हीही अडचण कागदी चलनानें नाहींशी कशी होते हे पुढें एका भागांत पहावयाचें आहे. सोन्या-रुप्याच्या पैशाच्या या गैरसेोईमुळे लोकांमध्यें नेआण करण्यास अत्यंत सुलभ अशा कागदी चलनाची वाण भासू लागते व ह्मणूनच अर्वाचीन सुधारलेलें सरकार चलनी नोटा या नांवानें फायदेशीर फेडींचे चलन याचा प्रसार करते . तेव्हां आतां या कागदी चलनाचा विचार करावयाचा आहे. मागील भागांत वर्णन केलेला धातुरूप पैसा, या भागांत वर्णन करावयाचा कागदी पैसा व पुढल्या एका भागांत वर्णन करावयाचें कागदीचलन या सर्वांचें स्पष्टीकरण खालील कोष्टकावरून सहज ध्यानांत येईल. या कोष्टकांतील पहिलें पद पैसा आहे व तें मागे दिलेल्या व्याख्येनुरूप व्यापक अर्थाने उपयोजिलेलें आहे. जो जो पदार्थ-मग तो कसलाही असो-पैशाचीं कार्ये करती तो तो पैसा या संज्ञेप्रत पावतो. या दृष्टीनें मागे वर्णिलेले व पुढें वर्णवयाचे अशा सर्व पैशांचे खालील वर्गीकरण होते.

                             पैसा 
 
                  घात्वात्मक            अघात्वात्मक अगर कागदी  
          मुख्य पैसा     उपपैसा      कायदेशीर            व्यावहारिक 
                              
                             परिवर्तनीय  अपरिवर्तनीय   चेक  हुंडी  विनिमयपत्र