पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/370

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३५८ ]

आहेत असें मात्र नाहीं. तेव्हां आतां हीं उपाधीभूत कारणें कोणतीं तें पाहिलें पाहिजे. या कारणांचा उल्लेख या मीमांसेचा उपक्रम करतांना सांगितलेल्या गृहीत गोष्टींत आला आहे.

जितक्या मानानें ऐनजिनसी व्यवहार घडतात किंवा पतीनें व्यवहार घडतात, तितक्या मानानें पैशाचे व्यवहार कमी होतात व या थोडया व्यवहारांना पैशाची पूर्वीची संख्या जास्त होते. अर्थात् ऐनजिनसी अदलाबदलीनें किंवा पतीच्या व्यवहारानें पदार्थाच्या किंमतींचें मान वर चढतें. तसेंच पैशाचा अथवा त्यांच्या द्रव्याचा कलाकौशल्याकडे उपयोग होतो; व या मागणीचा परिणाम पैशाकडे उपयोग होण्याच्या द्रव्याच्या संख्येवर होतो. म्हणजे यानें देशांतील पैशाच्या संख्येचा कमी होण्याकडे कल असतो. तेव्हां या कारणाचा परिणाम वर निर्दिष्ट केलेल्या कारणापेक्षां उलट होतो, शिवाय पैशाचें द्रव्य-सोनें-रुपें-हें उत्पन्न करण्यास कमी जास्त खर्च लागतो,तेव्हां पैशाचें मोलं अगर त्याची क्रयणशक्ति ही सोन्यारुप्याच्या उत्पादनव्ययावरही अवलंबून आहे हें उघड झालें. परंतु सोनेंरुपें हें खनिज द्रव्य आहे व त्यांच्या किंमतींचा विचार मागे एके ठिकाणी केला आहे तेव्हां त्याची येथें पुनरावृत्ति करण्याचें कारण नाही.

यावरून पैशाच्या मोलाच्या मीमांसेंतील सत्यासत्याचा भाग कोणता हें सहज ध्यानांत येईल. पैशाच्या मोलाची संख्यात्मकमीमांसा हें एक मागे स्पष्टीकरण केलेल्या मागणी व पुरवठा या तत्वांचेंच विशेष स्वरूप होय असें म्हणण्यास हरकत नाहीं. पैशाचा पुरवठा म्हणजे पैशाच्या द्रव्याचा पुरवठा होय व हा पुरवठा कमीजास्त होणें ही आकस्मिक गोष्ट आहे. शास्रीय शोधावर व खाणीच्या शोधांवर ती अवलंबून आहे. तरी पण अमेरिकेच्या शोधापासून आजपर्यंतच्या सोन्यारुण्याच्या उत्पत्तीकडे नजर फकली तर हा पुरवठा सारखा वाढत आहे असे दिसून येईल.[३५९ पान पहा.] परंतु त्याबरोबर व्यापारी व्यवहारांचीही आतोनात वाढ होत आहे.म्हणजे पैशाला मागणीही जास्त जास्त होत आहे.३५९ पानात दिलेल्या कोष्टकावरून सोन्यारुप्याच्या भावांतही कसकसा फरक होत गेला आहे हें दिसून येईल. परंतु सुधारलेल्या राष्ट्रांमध्ये पैशाची कार्ये उरकणारे आणखी एक साधन अस्तित्वांत आले आहे व त्याचा फैलावही झपाटयानें होत आहे.यामुळेंच सर्व जगांत