पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/37

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२५]


स्थितींत व्यापार चालू शकतो याचे रिकार्डोने मोठ्या मार्मिक तहेन विवेचन केले आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे परदेशी व्यापाराचा खरा व एकच फायदा हा होय कीं, त्याचे योगाने देशांतील भांडवल व श्रम यांच्या मोबदला आधिक माल मिळू शकतो, म्हणजे परकी व्यापाराच्या योगानें जणू कांहीं देशाची संपाति वाढल्याप्रमाणे होते. याही विषयाचा पुढे आपल्यास विशेष तऱ्हेने विचार करावयाचा आहे. तेव्हां सध्या इतकें विवे चन वस्स आहे.
 ज्याला अर्थशास्त्राचे इतिहासकार अभिमत अर्थशास्त्र म्हणतात, ते मुख्यतः या तीन ग्रंथकारांनी बनविलें असें म्हणण्यास हरकत नाही. यापुढील या पंथाचा अभिमान व पुरस्कर्ता म्हणजे जॉन स्ट्अयूर्ट मिल्ल होय. अँडाम स्मिथच्या अर्थशास्त्रावर पुष्कळ ग्रंथकर्त्यांनी आक्षेप घेतले. यामुळे अर्थ शास्त्रातील पुष्कळ प्रश्न पुनः वादग्रस्त बनले; शिवाय रिकॅर्डोनंतर व कांहीं अंशी त्याच्याच एककल्ली सिद्धान्तामुळे सामाजिक पंथ नांवाचा एक अर्थ शास्त्रात नवीन पंथ निर्माण झाला. या पंथाचा हेतु संपत्तची वाटणी न्यायाने व समतेने करण्याचा होता. या पंथाची हकीकत या ग्रंथाच्या तिसऱ्या पुस्तकांत दिली असल्यामुळे येथे त्याची पुनरुक्ति करीत नाही. परंतु या पंथानेही अभिमत अर्थशास्त्राच्या कांहीं प्रमेयांच्या सत्यत्वाबद्दल लोकांच्या मनांत संशय उत्पन्न केला. तसेच अर्थशास्त्रविषयक कांहीं नवीनच प्रश्न उपस्थित झाले. या सर्व नवीन सामग्रीचा उपयोग करून मिल्लने जुन्याच पायावर व जुन्याच पद्धतीने परंतु सामाजिक पथाने व उदयोन्मुख अशा ऐतिहासिक पंथाने आणलेल्या नव्या ज्ञानाचा उपयोग करून एक मोठा व्यापक ग्रंथ लिहिला. अर्थशास्त्रावरील त्याचा पहिला ग्रंथ ‘‘ अर्थशास्त्रातील कांहीं निकाल न लागलेल्या प्रश्नांसंबंधीं » होता. या ग्रंथांत केलेल्या विवेचनाचा पुढे मिल्लने आपल्या प्रसिद्ध ग्रंथांत उपयोग केला. मिल्लची महत्वाकांक्षा ‘‘ अर्वाचीन अँडाम स्मिथ " लिहिण्याची होती, व ती पुष्फळ अंशी सफलही झाली. सुमारे पन्नास वर्षे अर्थ शास्त्रावरील मिल्लचे पुस्तक म्हणजे एक मोठा आधारभूत ग्रंथ गणला जात असे. मिल्लच्या लेखांच व ग्रंथांच प्रसाद हा एक विशेष गुण आहे. तसेच प्रतिपक्षाची मते योग्य तऱ्हेने मांडून मग त्यांचे यथार्थ खंडण कर ण्याची त्याची शैली वर्णनीय आहे. तसेच कोणत्याही तत्वाला योग्य