पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/357

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३४५] दीडपटीच्याही वर गेला. यामुळें हिंदुस्थान सरकारचें धावें दणाणलें व आपल्या तिजोरीचें दिवाळें निघणार. तेव्हां नाण्यासंबंधीं कायदा केला पाहिजे म्हणून त्यांनीं कांहीं सूचना स्टेट सेक्रेटरीकडे पाठविल्या व त्यांचा विचार करण्याकरितां हर्शेल या गृहस्थाच्या अध्यक्षतेखालीं हर्शेल कमिटी नेमण्यांत आली व तिच्या सूचनेप्रमाणें १८९३ च्या अखेर हिंदुस्थान सरकारनें आपल्या टांकसाळी बंद केल्या व रुपयांची संख्या कमी करून रुपयांची कृत्रिम रीतीनें किंमत वाढवून आपल्या हुंडणावळीच्या अडचणींतून पार पाडण्याचा मार्ग काढला. या कायद्यानें रुप्याची भली मोठी मागणी कमी झाली; व चांदीचा भाव आणखी उतरत चालला. हिंदुस्थानांत याप्रमाणें चांदीचें खुलें नाणें बंद झाल्याबरोबर अमेरिकेनें आपला शरमॅन कायदा रद्द केला. याप्रमाणें अमेरिकेला द्विचलनपद्धतीच्या प्रसाराचा मार्ग सुलभ करण्याचा प्रयत्न सोडून द्यावा लागला. हिंदुस्थानच्या व अमेरिकेच्या या दोन कायद्यांनीं रुप्याचा भाव फारच कमी झाला. १८९० मध्यें जो भाव १९३/4 ते १ या प्रमाणांत होता तो अवघ्या चार वर्षांत ह्मणजे १८९४ मध्यें ३२ १/2 ते १ या प्रमाणांत गेला. अमेरिकेनें आणखी कांहीं वर्षे चांदीच्या प्रसाराकारितां खटपट केली. परंतु ती खटपट अरण्यरुदनवत् होती. देशामागून देशानें इंग्लंड व जर्मनीचें अनुकरण केलें व सोन्याची एकचलन पद्धति सुरू केली. उदाहरणार्थ, १८९२ मध्यें ऑस्ट्रिया देशानें सोन्याचें एकचलन कायदेशीर केलें, चिली दशानें १८९५ मध्यें तोच मार्ग स्वीकारला; शेवटीं रशिया व जपान या दोन राष्ट्रांनीं १८९७ मध्यें सोन्याचे नाण्याचा स्वीकार केला. हिंदुस्थानांत १८९३ मध्यें जें धोरण स्वीकारलें गेलें त्यानें हुंडणावळीवर इष्ट तो परिणाम होत चालला व सुरू केलेल्या धोरणाची परिपूर्णता करण्याचें हिंदुस्थान सरकारनें १८९९ मध्यें ठरविलें व हिंदुस्थानांत सोन्याचा पेौंड हा कायदेशीर फेडीचें चलन केला. मात्र रुपया जरी आतां उपपैसा झाला तरी तो अमर्याद प्रमाणांत चालावयाचें ठरलें. १९०० मध्यें अमेरिकेनें शेवटीं संन्याचीच एकचलनपद्धति स्वीकारली. याप्रमाणें जगांतील प्रमुख राष्ट्रांच्या चलनपद्धतीचा इतिहास आहे सर्व जगांत एकचलनपद्धतीचा भराभर अंगीकार कसा झाला, हें त्यावरुन दिसून येईल. एकचलनपद्धति व द्विचलनपद्धति, यांमध्यें पुष्कळ