पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/355

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३४३ ] बिचल होण्यांत होऊं लागला. फ्रान्समध्यें तर द्विचलनपद्धति सुरू होती; परंतु एकट्या देशाला अशी पद्धति चालू ठेवणें जड जाऊं लागलें. यामुळें १८६५ मध्यें फ्रान्सनें बेल्जम, इटली व स्वित्झर्लंड या चार देशांमिळून लॅटिन युनियन ह्मणून नाण्यांसंबंधीं संगनमतानें द्विचलनपद्धति व्यवस्थित स्वरूपावर सुरू केली. या युनियनमध्यें ग्रीस देश १८६४ मध्यें सामील झाला व पुढें वेळोवेळीं स्पेन, रोमानिया, सव्हिया व बल्गेरिया या देशांनीं आपली नाण्यांची पद्धति लॅटिन युनियनच्या पद्धतीशीं जुळती केली व ते देश या युनियनचे सभासद झाल्याप्रमाणेंच झाले. याप्रमाणें एकीकडे द्विचलनपद्धतीला जास्त व्यवस्थित स्वरूप येत चाललें तोंच दुसरीकडे एकचलनपद्धतीला जोर येत चालला. १८७० मध्यें फ्रान्स व जर्मनी या दोन देशांमध्यें भयंकर युद्ध झालें व त्यांत फ्रान्सचा पूर्ण पराभव होऊन फ्रान्सला ४ अब्ज रुपये खंड्णी जर्मनीला दयावी लागली. आपल्या दशात येणाच्या या माेठया रकमेचा फायदा घेऊन जर्मनीनें सान्याची एकचलनपद्धाति सुरू करण्याचा निश्चय केला. इंग्लंडची भरभराट होण्याचें एक कारण त्याची सोन्याची एकचलनपद्धति होय अशी समजूत जर्मनींतील मुत्सद्यांची झाली होती; व म्हणून १८७३ सालीं जर्मनीनें सोन्याचें एकचलनी नाणें सुरू करून देशांतील सर्व चांदीचें नाणें वितळून विकावयास काढलें. सर्व जर्मनीचें आतां एक राष्ट्र बनलें होतें. एवढ्या मोठ्या देशाची चांदीची वार्षिक मागणी कमी होऊन चांदीचा बाजारांतील पुरवठा वाढला. या दुहेरी कारणानें चांदीचे भाव भराभर उतरत चालले व गाडी ज्याप्रमाणें उताराला लागावी तशी चांदीची स्थिति झाली. ही सर्व स्वस्त चांदी फ्रान्सच्या व लॅटिन युनियनच्या टांकसाळींत येऊं लागली व आतां फ्रान्सची द्विचलनपद्धति ह्मणजे आपल्या शत्रूला दुहेरी फायदा करून देणारी संस्था भासू लागली व ह्मणून आपल्या देशांत जर्मनीच्या स्वस्त चांदीचा पूर लोटूं नये ह्मणून लॅटिन युनियननें चांदीची नाणी टांकसाळीत न पाडण्याचा कायदा करून या पुराच्या आंत येण्याला प्रतिरोध केला. या काळीं फ्रान्स व लॅटिन युनेियनचे इतर सभासद व युनायटेडस्टेट्स यांनीं सर्व प्रमुख राष्ट्रांच्या संमतीनें सर्व देशांत द्विचलनपद्धति सुरू करण्याबद्दल पुष्कळ खटपटी केल्या; यासंबंधानें चार कॉन्फरन्सेस झाल्या. परंतु त्यांचा निकाल पूर्वीं ठरल्यासारखाच