पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/348

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३३६] समर्थनार्थ या पद्धतीचे समर्थक युरोपांतील १८७३ पर्यंतच्या इतिहासाचा दाखला देतात. तेव्हां आतां या महत्वाच्या मुद्द्याचा विचार केला पाहिजे.

  द्विचलनपद्धतीच्या स्थिरतेविरुद्ध जें प्रमाण पुढें केलें जातें हे कीं, कोणत्याही धातूच्या पुरवठ्यांत किंवा मागणींत थोडासा जरी फरक झाला तरी त्यायोगानें त्या धातूचा बाजारभाव कायदेशीर भावापासून भिन्न होईल. परंतु समतावहक्रियेचें समर्थक हेंच प्रमाण उलट लावून दाखवितात. कारण समजा कीं, द्विचलनी देशाच्या बाहेरील ठिकाणीं चांदीच्या थोडाशा वाढीनें त्याचा बाजारभाव द्विचलन देशांतील कायद्यानें ठरलेल्या भावाच्याखाली उतरला. पूर्वी सांगितल्याप्रमाणें अशा स्थितीत द्विचलनी देशांतील सोनें बाहेरील स्वस्त रुपें घेण्याकरितां बाहेर पाठविलें जाईल. परंतु या ठिकाणीं चांदीला मागणी जास्त झाल्यानें त्याची किंमत वाढू लागेल. व सोन्याच्या जास्त पुरवठ्यानें त्याची किंमत कमी होऊं लागेल व या दोन धातूंच्या समतावहक्रियेनें बाजारभाव कायदेशीर भावाबरोबर होईल. मात्र असें होण्यास दोन्ही धातू पुष्कळ प्रमाणांत अस्तित्वांत असल्या पाहिजेत.

परंतु अन्तर्राष्ट्रीय द्विचलनाच्या योजनेंत ही गोष्ट घडून आलीच पाहिजे हें उघड आहे. एखाद्या देशानें एकाकी व स्वतंत्रपणें द्विचलनपद्धति स्वीकारली तर ती ढासळली पाहिजे, असे द्विचलनवादी अर्थशास्रकार कबूल करतात. परंतु त्याचें म्ह्णण असें आहे कीं, जगांतील प्रमुख व औद्योगिक देशांनीं संगनमतानें जर द्विचलनपद्धति स्वीकारली तर चांगल्या त-हेनें चालू शकेल. व ज्याप्रमाणें एका पायावर स्टूल उभे राहणार नाहीं परंतु ते तीन किंवा चार पायांवर राहील या दोन म्हणण्यात कांहीं एक विसंगतता नाहीं त्याचप्रमाणे वरील दोन विधानांत विसंगतता नाहीं. एक दाखला घेऊन अन्तरांट्रीय द्विचलनपद्धतीमध्यें समतावह क्रिया कशी घडेल हें दाखविणें इष्ट आहे.

समजा कीं, १८७३ सालीं फ्रेंच व इतर टाकसाळी चांदीला बंद करण्याचे ऐवजी सर्व मोठमोठ्या औद्योगिक' देशांनी १५ ते १ या भावाने अंतर्राष्ट्रीय द्वीचलनपद्धती स्वीकारली असती.आता प्रश्न असा आहे की, द्वीचलनाच्या

अति पाळल्या असतां हा ठरलेला भाव स्थिर राहता किंवा नाहीं. समताव क्रियेचा परिणाम पाहण्याकरिता कांहीं आकडे