पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/343

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३३१] लेलीं व पूर्ण वजनाचीं नाणीं प्रचलित असतात. आतां या दोन प्रकारच्या नाण्यांमधील भेद जरी सामान्य लोकांस समजत नाहीं तरी तो पेढीवाले किंवा सराफ यांना कळतोच. म्हणून जेव्हां त्यांना परदेशींपैसे पाठवावयाचे असतात त्या काळीं पूर्ण वजनांच्याच नाण्याचा ते उपयोग करतील हें उघड आहे. कारण झिजलेलीं किंवा हलकीं नाणीं या कामीं उपयोगी आणणें ही नुकसानीची बाब आहे. परंतु देशामध्यें पूर्ण-वजनी किंवा हलकीं नाणीं सारख्याच किंमतीचीं गणलीं जातात. यामुळेच नेहमीं हलकीं नाणीं प्रचारांत रहावयाचीं असा ग्रेशॉमच्या सिद्धांताचा इत्यर्थ आहे. यामुळे देशांतील नाणीं सुधारण्याचे अर्धवट प्रयत्न निष्फळ होतातदेशांतील सरकारनें कांहीं नवीन नाणीं पूर्ण वजनाचीं पाडून तीं प्रचारांत आणलीं असें समजा. परंतु देशांत कमी वजनाचीं नाणीं जर बरीच प्रचारांत असलीं तर हीं नवीन नाणीं वापरांतून नाहींशी होतील. म्हणून नाणीं सुधारण्याचा प्रयत्न सररहा व मोठ्या प्रमाणावर एकदम केला पाहिजे तर तो सफल होईल. ह्राणजे सरकारनें नवीं नाणीं मुबलक पाडून जुनी नाणीं लोकांकडून टांकसाळीत मागवून सर्व नाण्यांची थोडया अवधींत सुधारणा केली पाहिजे तर ही सुधारणा यशस्वी होईल. ग्रेशंमचा सिद्धांत सत्यपूर्ण आहे खरा. तरी पण त्यालाही कांहीं मर्यादा आहेत. प्रथमतः मनुष्य हा संवयीचा प्राणी आहे हें ध्यानांत ठेविलें पाहिजे. एकदां नाणीं प्रचारांत आलीं ह्राणजे लोकांना तीं घेण्याची संवय होते व मग कोणी पूर्ण-वजनांचीं किंवा हलकीं यांकडे पहात नाहीं. जोंपर्यंत बाजारांत तीं घेतलीं जात आहेत तोंपर्यंत ग्रेशंमच्या सिद्धांताचा परिणाम होत नाहीं. परंतु एकदां हलकीं नाणीं लोक घेत नाहींत असें दिसलें ह्राणजे लोक साशंक होतात व मग तुलनात्मक पव्द्ति सुरू होते. दुसरी गोष्ट व्यापार म्हटला ह्राणजे ने त्याला कांहीं नाणीं पाहिजेतच व ज्या मानानें दैववेव फार मोठ्या प्रमाणावर असेल त्या मानानें देशांत पैसाही पाहिजे. तेव्हां देशांत पैसा जर कमीच असेल तर जड व हलकीं नाणीं सारखीच प्रचारांत राहतील. परंतु हे दोन अपवाद खेरीजकरून ग्रेशँमचा सिद्धांत खरा आहे. या सिद्धांतावरून पैसा व इतर पदार्थ यांमधील कार्यभागाचा भेद चांगला दिसून येतो. इतर सर्व मालासंबंधीं असें आहे कीं, चांगला माल लवकर खपतो म्हणजे चांगला माल वाईट मालाला बाजारा