पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/341

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३२९1 प्रमाणें इंग्लिश टांकसाळीला १२३॰०७४ ग्रेनच्या खालील वजनाचा किंवा १२३॰४७४ ग्रेनपेक्षां जास्त वजनाचा पौंड टांकसाळीबाहेर पाठवितां येत नाहीं. टांकसाळींतून बरोबर वजनाचे पेोंड आले तरी वापरामुळे त्यांची झीज होत असते. अशा झिजेची कायदेशीर मर्यादिा १२२॰५० ग्रेनपर्यंत आहे. म्हणजे इतक्या वजनापेक्षां कमी भरणारा पैोंड कायदेशीर चलन गणला जाणार नाहीं. असें नाणें टांकसाळींत पाठविलें पाहिजे व त्याचा तोटा ज्याच्याजवळ हें नाणें सांपडेल त्यानें भरला पाहिजे. इंग्लंडची चलनपद्धति मुत्कव्दार पद्धतीची आहे व सर्व शास्त्रीय पद्धतीचा हा एक गुण असतो. म्हणजे कोणत्याही मनुष्यानें टांकसाळींत कायघाबरहुकूम सोनें आणून दिलें म्हणजे त्याला कायद्यांत सांगितलेल्या दराप्रमाणें नाणीं मिळालींच पाहिजेत असा निर्बध आहे. व या पद्धतीप्रमाणं पेोंडाचे मोल व त्यांतील सोन्याचे मोल हीं एकच असतात. म्हणजे पौंड जरी वितळून बाजारांत सोनें विकावयास नेलें तरी त्यामध्यें मनुष्याचें नुकसान होणार नाहीं. मुख्य पैसा व उपपैसा यांमध्यें हाच मोठा भेद असतो हें मागें सांगितलेंच आहे. येथपर्यंत इंग्लंडाच्या मुख्य चलनाचें स्वरूप निवेदन झालें व हें सविस्तर करण्याचें कारण हल्लीं हिंदुस्थानचें तात्विकदृष्टया तेंच मुख्य चलन आहे. तेव्हां या चलनाच्या स्वरूपाची वाचकांस माहिती असणें जरूर आहे.

इंग्लंडांतील दुसरें सोन्याचें नाणें ह्राणजे अर्धा पांडाचें होय. व याचें वजन, इतर मर्यादा वगैरे पैोंडांच्या नियमाप्रमाणेंच आहेत. मात्र सर्व प्रमाण अध्यानें आहेत. हे  उघड आहे.

बाकीचीं नाणीं उपपैसा म्हणून वापरतात. हीं नाणीं खासगी व्यक्तींना पाडून घेण्याचा हृक्क नाहीं. हीं नाणीं व्यापाराच्या गरजेप्रमाणें सरकार पाडतें. याची किंमत सांकेतिक आहे. म्हणजे यांतील धातूची किंमत सांकेतिक किंमतीपेक्षां पुष्कळ कमी असते. हीं नाणीं परदेशों पाठविलीं किंवा वितळलीं तर मालकाचें शेकडा १० पासून ३० पर्यंत नुकसान होईल. उपपैसा नेहमीं असा सांकेतिक किंमतीचाच करतात. ह्राणजे मग असें नाणें नेहमीं वापरांत राहतें व देशांतून बाहेर जाण्याची किंवा वितळलें जाण्याची भीति नसते.

 ईंग्लंडांतील हा उपपैसा दोन धातूंचा केलेला आहे. शिलिंग हें