पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/340

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(३२८) आहे त्या अर्थी या पद्धतीचें थोड्या विस्तारानें वर्णन करून हा भाग संपविण्याचा विचार आहे.

         इंग्लंडची चलन पद्धति संमिश्र परंतु एकचलनपद्धतीच्या जातीची आहे. येथें तीन धातूंचीं नाणीं पाडतात. परंतु कायदशीर फेडीचें मुख्य चलन एकच आहे. तें सोन्याचें पौंड हें नाणें होय. बाकीचीं नाणीं किरकोळ व्यवहाराकरितां उपपैसा म्हणून पाडली जातात. इंग्लंडांतील टांकसाळीच्या काय्द्याप्रमाणें एक पौंडाचे वजन १२३.२७४४७ ग्रेन अथवा १०.९५७६ आणे भार पाहिजे. यापैकीं ११ भाग शुद्ध सोनें व एक भाग हीणकस धातु मुख्यतः तांबे असतें. म्हणजे कायद्यानें पैोंडांमध्यें ११३.००१६० ग्रेन पैोंडाचें वजन जवळजवळ ११ आणे भार असतें व त्यांतील शुद्ध सैन्याचें वजन १० आण्यांपेक्षां किंचित जास्त असतें. आतां एक पौंड वितळून त्यांतील सोने काढले तर २४ रुपये तोळ्यास या भावानें त्या सोन्याची किंमत बरोबर १५ रुपये होईल यावरून असें दिसून येईल की,इंग्लंडच्या चलूनपद्धतींत सोन्याचीं नाणीं करणें हें काम सरकारचे आहे असे समजले जातें व म्हणून टांकसाळीचा सर्व खर्च सरकारी तिजोरीतून केला जातो.अर्थात जितक्या वजनाचें सोनें टांकसाळीत यावे  तितक्याच वजनाचें नाणें पाडून मिळतें. टांकसाळींत जर १ औस सोनें दिलें तर मनुष्याला टांकसाळींतून ३ पैोंड १० शिलिंग व १०॥ पेन्स इतकें नाणें मिळालें पाहिजे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारांत नाणें पाहून घेण्याकरिता   थोडीशी कसर द्यावी लागते. कारण सोनें टांकसाळींत दिल्यापासून  नाणी पाडून मिळविण्यास थोडा वेळ लागतो, तितक्या दिवसांचे व्याज बुडते व म्हणूनच प्रत्यक्ष व्यवहारांत इंग्लंडची बँक एका औसाबद्दल ३ पौ.१७ शि.१०||पे .इतकी नाणी न देता ३ पौंड १७ शिलिंग ९ पेन्स देते. म्हणजें प्रत्येक  औसापाठीमागे  बँक १॥। पेन्साची कैसर कापून घेते.
             
     जरी कायद्याप्रमाणे कायदेशीर पौंडांचे नक्की वजन १२३.२७४ येन असले पाहिजे असे आहे तरी  पण टाकसाळीची यंत्रे कितीही नाजूक केली तरी सर्व पौंड सारखे पडणे अशक्य आहे व म्हणून टाकसाळीकरिता कायदेशीर नाण्याच्या वजनाच्या मर्यादा ठरविलेल्या आहेत. या-