पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/338

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 [३२६]

होंतो, तो रुप्याचा पेनी होय. हा पेनी इंग्लंडांतील हल्लींच्या तीन पेनींच्या नाण्याच्या आकाराचा होता. या पद्धतीचा दोष उघड आहे. रुप्याचें नाणें किरकोळ देवघेवीला फारच मोलवान् होतें तर घाऊक व मोठमोठ्या विकीला तें फार लहान असल्यामुळे गैरसोईचें होतें. तेव्हां लहान किंमतींची नाणीं पाडण्याबद्दल सरकारांत अर्ज झाले व ही अडचण दूर करण्याकरिंता उपपैशाऐवजी नाणीं पाडण्यांत आलीं व प्रथमतः तीं चामड्याच्या तुकड्याचीं होती. परंतु पुढें ब्रांझ धातूचे फर्दिंग्ज पाडण्यांत आले. च मोठ्या किंमतीच्या नाण्याकरितां सोन्याचीं नाणीं पाडण्यांत आलीं.या इतिहासावरून पहिल्या पद्धतीप्रमाणेंच ही पद्धति जरी पूर्वकाळीं प्रचलित असली तरी या दोन्ही पद्धतींच्या गैरसोयीमुळे त्या मागें पडतात व जास्त सोईच्या नाण्याच्या पद्धति अस्तित्वांत येतात.
   ३ द्विचलन  पद्धति या पद्धतींवर दोन धातू कायदेशीर फेडीचीं चलनें मानली जातात. यांमध्ये दोन प्रकार आहेत. पहिल्यांमध्ये दोन धातूंमधील प्रमाण कायद्यानें ठरलेलें नसतें; तर दुसऱ्यांत तें कायद्याने ठरलेलें असतें या पद्धतीमध्यें सरकार सोन्याचीं व रुपयाचीं अशीं दोन्ही प्रकारचीं नाणीं टांकसाळींत पाडतात. दोन्ही धातूंचीं नाणीं अमर्यादितं प्रमाणात चालतातव दोन्हीहीं कायद्यानें सारखींच खेडीचीं चलनें मानलीं जातात.

अर्थात् मनुष्याला वाटेल त्या नाण्यांत आपल्या कर्जाची फेड करण्याचा अधिकार असतो व कोणत्याही मनुष्याला सोन्या-रुप्यांपैकीं कोणतेंही नाणें कायदेशीर रीतीनें नाकारतां येत नाहीं. या नाण्यांची अदलाबदल कोणत्या प्रमाणांत व्हावी हें कायद्यानें ठरविलें नसलें म्हणजे तें सोन्या-रुप्याच्या बाजारभावानें ठरत असतें परंतु केव्हां केव्हां सोन्याच्या एका नाण्याला रुप्याचीं अमुक नाणीं द्यावीं. असा कायद्यानें निर्बंध केलेला असतो. परंतु जसजशी बाजारभावांत चलबिचल होते त्या मानानें कायद्यानें ठरवीलेल्या भावांत फरक करावा लागतो.

४ संमिश्र चलन पद्धती त्या पद्धतीप्रमाणें एक धातूंचें नाणें हें कायदेशीर फेडीचें चलन असतें. परंतु याचेबरोबरच दुसऱ्या धातूचे उपपैशाचें चलन असतें.मुख्य पैसा हाच अमर्यादित प्रमाणांत

देवघेविमध्यें चालतो.उपपैसा हा ठराविक प्रमाणांतच देवघेवींत चालतो. उदाहरणार्थ, इंग्लंडमध्यें सोन्याचा पौंड एवढेंच कायदेशीर फेडीचें चलन आहे.पौंड हे सर्व देव