पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/336

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पयोग करुन नाणीं हलकीं करून त्यापासून फायदा करून घेतला आहे व एके काळीं पैशाची ही हीणकशी युरोपांतल्या बहुतेक दशांमध्यें घडून आलेली होती. व यामुळेंच हर्बर्ट स्पेन्सरसारखे व्यक्तिक तत्वाचे पूर्ण समर्थक यांनीं नाणीं पाडण्याचा हक्क इतर गेोष्टींप्रमाणें खासगी व्यक्तींस व संस्थांस असावा असें प्रतिपादन केलें आहे. तरी पण सुधारलेल्या सव देशांत आतां टांकसाळीचा अधिकार सरकारचा असला पाहिजे ही गाट सर्वसंमत आहे. व त्या प्रकारचाच सर्व राष्ट्राचा प्रघातही आहे.

   धातूच्या पृष्ठभागावर उठविलेल्या ठशाच्या शाबूतपणावरून ज्याचा कस व वजन हीं ओळखतां येतात असे सोन्यारुप्याचे तुकडे म्हणजे नाणीं होत अशी जेव्हन्सनें नाण्याची व्याख्या दिली आहे व ती सर्वामान्यच आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.
     नाण्याचे आकार मात्र किती तरी प्रकारचे दृष्टीस पडतात. एखाद्या पुराणवस्तुसंग्रहांतील या भागाकडे लक्ष दिलें असतां नाण्याच्या आकाराच्या विविधत्वाची सहज कल्पना होईल. परंतु नाण्याचा आकार त्याचें रूप व त्यावर ठसे उठविण्याची पद्धति यांमध्यें सर्वात चांगले कोणते हें ठरवितांना चार गोष्टी ध्यानांत ठेवाव्या लागतात.
      1 बनावट नाणीं पाडतां यऊं नयेत 
      २ नाण्यांतील धातू लबाडीनें काटतां येऊं नयेत. 
      ३ नाण्याच्या वापरानें होणा-या स्वाभाविक झिजेपासून फार तेाटा होऊं नये.
      ४ नाणें पाडणाऱ्या राजाचें व तें वापरणाऱ्या लोकांचें तें नाणें एतहासिक व कलाकौशल्याचें स्मारक बनावें.
   या चारहेतूंच्या सिद्धयर्थ हल्लींची वर्तुळाकार व धारेवर रवे रवे असलेल्या नाण्याची सार्वत्र प्रचारांत आलेली आहे व टांकसाळीमध्यें सर्व काम नाजूक व भानगडीच्या यांत्रासाहाय्यानें केंलें जातें
          परंतु हजारों प्रकारचे व्यवहार सुलभ रीतीने करतां यावे म्हणून अर्वाचीन काळीं बहुतेक सर्व देशांत पुष्कळ प्रकारचीं नाणीं पडतात. लहान लहान किंमतीच्या
व किरकोळ अदलाबदलीकरितां कांहीं सांकेतिक नाणीं पाडतात त्याला उपपैसा म्हणतात. हीं नाणीं