पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/335

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भाग सातवा.

              नाणीं व धात्वात्मक पैशाचे प्रकार.
    मागील भागांत पैशाचें सामान्य स्वरूप व पैशाच्या द्रव्याचे गुणधर्म यांचा विचार केला. त्यावरून सोनें, रुपें या दोन धातूच पैशाच्या द्रव्याला फार योग्य आहेत असें दिसून येईल. औद्योगिक बाबतींत पुढारलेल्या सर्व देशांमध्यें सोन्या-रुप्याचाच पैशासाठीं उपयोग केलेला आहे असें इतिहास सांगतो. तेव्हां आतां या पैशाचें विशेष स्वरूप काय व निरानिराळ्या देशांत कोणत्या पैशाच्या पद्धति चालू आहेत यांचा या भागांत विचार करावयाचा आहे.
  सोन्या-रुप्याचा पैशाच्या कामीं उपयोग व्हावयास लागला म्हणजे तो प्रथमतः सोन्या-रुप्याचे तुकडे अांगठ्या, वळी अशासारख्या रूपानें होऊं लागतो. व हे सोन्या-रुप्याचे तुकडे वजन करून घेतात. परंतु ही पद्धति फार गैरसोईची असल्यामुळे नाण्याची पद्धति सुरू होते.
  युरोपामध्यें होमरच्या काळीं नाणीं ठाऊक हेातीं असें दिसत नाहीं. स्पार्टन कायदेकार लायकरगस यांचे काळा तीं ठाऊक हेोतीं हें स्पष्ट आहे. यावरून युरोपामध्यें नाणीं पाडण्याची पद्धति इसवीसनापूर्वींच्या ३৩০ वर्षांच्या अलीकडील आहे यांत शंका नाहीं. हिंदुस्थानविषयक पैशासंबंधाचा व नाण्यासंबंधाचा विचार एका निराळ्याच भागांत करावयाचा आहे तेव्हां येथें त्याच्या उल्लेखाची जरुरी नाहीं. प्रथमतः इतर वस्तूंप्रमाणें सोन्यारुप्याचीं नाणी खासगी लोक पाडीत; परंतु,सर्व अदलाबदलीचें साधन, मालाचें मोल मोजण्याचें परिमाण, कालांतरानें पु-या होणा-या देवघेवीचे उपकरण व संपत्ति शिल्लक टाकण्याचा उपाय या नात्यानें पैशाला महत्व फार येतें व इतक्या महत्वाची गोष्ट खासगी व्यक्तींच्या किंवा संस्थांच्या ताब्यांत ठेविल्यानें लबाडी होण्यास जागा फार राहते. यामुळें नाण्याच्या रूपानें पैसा पाडण्याचें काम नेहमीं राजाचें असें समजलें जातें. अनियंत्रित राज्यसत्तेमुळें कांहीं राजांनीं या नाणें पाडण्याच्या अधिकाराचा दुरु