पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/332

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३२० ] पैसे पुन्हां दुस-या वस्तु खरेदी करण्यांत खर्च न करतां मागें टाकीत असतो, व अशानें आपण संपत्तीचा सांठा करीत आहों , असें त्या मनुष्याला वाटतें व तें बरोबरही आहे. कारण या पैशानें पुढें आपल्याला पाहिजे ती वस्तु घेतां येईल अशी त्याची खात्री असते. शिवाय इतर वस्तूंप्रमाणें पैसे शिल्लक टाकण्यानें वाईट होत नाहींत; नासत नाहीत; कमी होत नाहीत; गंजत नाहींत.तेव्हां असा पैसा आपल्या संग्रही ठेवण्याची प्रवृत्ति कृषिवृत्ति व उद्योगवृत्ति समाजांत सर्वत्र दृष्टीस पडावी हें स्वाभाविक आहे.

 पैशाचीं हीं वरील कार्ये होत व हीं कार्ये किंवा कार्यभाग ज्या पदार्थाकडून समाजांत करून घेतात तो पैसा होय. आतां हा कार्यभाग चांगल्या प्रकारें संपादण्याकरितां वस्तूंमध्यें कोणकोणते गुण पाहिजेत हें पाहिलें पाहिजे. अर्थशास्त्रकारांनीं सात गुणां पैसा होण्यास येाग्य असणा-या पदार्थामध्यें असले पाहिजेत असें सांगितलें आहे.
  पहिला गुण उपयुक्तता व मोल हा होय. पैसा होणा-या वस्तूंमध्यें उपयुक्तता व मोल हा गुण पाहिजे. कारण ज्या वस्तूनें हजारों वस्तूचें मोल मोजावयाचें आहे व ज्यानें हजारों वस्तूंची अदलाबदल व्हावयाची आहे अशा वस्तूला स्वतःची उपयुक्तता व तदंगभूत मोल हें पाहिजे हें  उघड आहे व मार्गे ज्या अनेक वस्तूं पैशासारख्या उपयोजिल्या जातात म्हणून सांगितलें आहे त्या सर्वांमध्यें समाजाच्या त्या त्या अवस्थेला अनुरूप अशी उपयुक्ता आहे असें दिसून येईल.मृगयावृत्ति-समाजांत कातडयाचा पैसा असतो परंतु या काळीं कातडें तात्काळचें एक साधन असतें. गोपालवृत्ति-समाजांत गुरेंढोरें हीं उपयोगी असतात. सारांश, ज्या ज्या वस्तू पैसा म्हणून वापरल्या जातात त्यांमध्यें थोड्याफार अंशानें उपयुक्तता व मोल हा गुण असतोच
  पैशाच्या द्रव्यांतील दुसरा गुण सुब्रह्मता हा होय.पैसा आपल्यास सहज इकडे तिकडे नेतां आला पाहिजे. म्हणजे त्याला थोड्या वजनांत व थोड्या आकारांत पुष्कळ मोल असलें पाहिजे.यात्र दृष्टीनें तांबें किवा लोखंड ही सोन्यारुप्यापेक्षां नेण्याआणण्यास फार गैरसोईचीं आहेत व म्हणूनच सुधारणेच्या प्रगतीबरोबर तांबे किंवा लोखंड हीं पैशाचीं द्रव्यें राहिलीं नाहिंत.समाजाच्या बाल्यावस्ठेतील पैशाच्या पुष्कळ प्रकरांत ही सुवाह्यता नसे व