पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/331

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 समाजामध्यें एखादा पदार्थ संकेतानें पैसा म्हणून ठरला म्हणजे समाजांतील सर्व देवघेव व अदलाबदल पैशानेंच होऊं लागते व पुढें व्यवहार ताबडतोबीचे न राहतां कर्ज व उसनवारी सुरू होते. उदाहरणार्थ, अ हा बपासून कांहीं जिन्नस उसनवार किंवा कर्जाऊ घेतो. समाजाच्या बाल्यावस्थेंत ही उसनवार पद्धतीही ऐनजिनसीच असते. शेतक-यास धान्याची गरज असली किंवा खताची गरज असली तर तो ज्याजवळ धान्य अगर खत शिल्लक असेल त्याजवळून तो उसनवार घेतो. कारण शेतक-याजवळ सध्यां तें विकत घेण्यास पैसा नाहीं म्हणून तो या जिनसा दुस-यापासून कर्जाऊ अगर उसनवार घेतो व कांहीं काळानंतर त्या जिनसा परत देण्याचा करार करतो. आतां या अवधीमध्यें त्या वस्तूचें मोल बदललेलें असेल व म्हणून तीच वस्तु परत करण्यामध्यें खरोखरीं एकाचा फायदा व दुस-याचें नुकसान होईल. उदाहरणार्थ, दुष्काळाच्या सालीं शतक-यानें जमीनदाराकडून धान्य उसनवार वेतलें व तें पुन्हां चार महिन्यांनीं सुगीच्या वेळीं परत केलें तर खरोखरी शेतक-यानें घेतलेल्या किंमतीचा माल परत केला असें होत नाहीं. कारण दुष्काळाच्या सालीं धान्याची किंमत जास्त होती, परंतु पीक चांगलें आल्यावर दुस-या वर्षी त्याच धान्याची किंमत किती तरी कमी होते. परंतु देशांत वापरला जाणारा पैसा याचें मोल स्थिर असतें. निदान त्यांत वारंबार चलबिचल होत नाहीं. झालीच तर फार सावकाशपणें होते. म्हणून अशा पुष्कळ काळानें पुऱ्या होणा-या देवघेवी पैशानें व्हाव्या हेंच रास्त आहे. तेव्हां पैसा हा अशा कालावधीनं पु-या होणा-या देवघेवीचें पारिमाण होतें. सुधारलेल्या सर्व देशांत कर्जवाम द्वा पेशांतच होतो.पुष्कळ काळपर्यंतचे. करारमदार पैशांतच ठरतात. अर्थात कालावधीनें पुऱ्या होणा-या देवघेवीचें साधन हैं पैशाचें तिसरें कार्य होय.

   पैशाचें चवथें कार्य वरील तीन कार्यापासून निष्पन्न होतें. हें चवथें कार्य ह्मणजे सर्व देशांमध्यें पैसा हा मोलाचा सांठा समजला जातो. कारण पैशाची किंमत सहसा बद्लत नाही. तो संकेतानें सर्वमान्य झालेला असतो तेव्हां ज्या ज्या माणसाला आपल्या उत्पन्नापुका संपत्ती शिल्लक  टाकण्याची इच्छा असते तो . तो मनुष्य पैशाच्या रूपानें तीं शिल्लक  टाकतो. अर्थात् आपण उत्पन्न केलेले पदार्थ तो   दुस-यास विकतो व त्या विक्रीचे आलेले