पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/327

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३१५] तिला अस्तित्व नसतें. ज्या किंमतीसभोंवतीं बाजार-किंमतीचें आंदोलन होत असतें ती मूळ-किंमत होय. मूळ-किंमत ही बाजारभावाची शेवटली मर्यादा होय. म्हणजे या किंमतीखाली बाजार-किंमत कायमची कधींच जाणार नाहीं. असें झालें म्हणजे ती वस्तु उत्पन्न होणारच नाहीं. असो. मूळ-किंमतीसंबंधानेंही दोन प्रकारच्या संपत्तींमधील फरक ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. ज्यांना आपण दुर्वर्धनीय संपत्ति म्हटलें आहे, त्यांच्या किंमती देशाच्या आधिभौतिक उन्नतीबरोबर वाढण्याचा कल असतो; तर ज्यांना सुवर्धनीय ह्मटलें आहे त्यांच्या किंमती कमी होण्याचा कल असतो. म्हणजे आधिभौतिक सुधारणेचा परिणाम आयुष्याच्या सुखसोई स्वस्त करण्यांत होतो. पूर्वीं ज्या गोष्टी मोठमोठ्या राजांनाही उपभोगण्यास सांपडत नसत त्या गोष्टी आतां सामान्य माणसांना सुद्धां उपभोगण्यास सांपडतात. तेव्हां आधिभेौतिक सुधारणेचा परिणाम सुखसोईच्या वस्तू उपभोगणा-या लोकांची संख्या जास्त जास्त करण्यांत होतो यांत शंका नाहीं. येथें या पुस्तकाचा पहिला पोटभेद संपला. आतां पैसा व तत्संबंधींचे सर्व प्रश्न यांच्या विचारास पुढल्या भागांत सुरुवात करावयाची आहे. भाग सहावा. पैसा. मृगयावृत्तिसमाजांत प्रत्येक मनुष्य आपल्या गरजा आपल्याच श्रमानें भागवितो. अशा समाजांत संपत्तीची फारशी वाढ झालेली नसते, व शिकार व कातडीं या रूपानें जी कांहीं थोड़ी बहुत संपत्ति असेल तिची अदलाबदल करण्याचे फारसे प्रसंग येत नाहींत व जरी आले तरी या काळी अदलाबदल ऐनजिनसी असते. समाजाच्या बाल्यावस्थेमध्यें ऐनजिनसी अदलाबदलीची पद्धति सर्वत्र दृष्टीस पडते. परंतु पैशानें अदलाबदल सुरू झाली ह्मणजे समाजाची औद्योगिक बाबतींत पुष्कळ प्रगति झाली आहे असें म्हणण्यास हरकत नाही. कारण ऐनजिनसी अदलाबदलींत