पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१९]

 परंतु देशाच्या सांपत्तिक वाढीबरोबर नफा मात्र कमी होतो. कारण जसजसें देशांत भांडवल जास्त वाढतें तसतशी भांडवलवाल्यांत धंद्याबद्दल चढाओढ होऊन भांडवलवाल्यांचा नफा कमी होत जातो. तरी पण कांहीं विशिष्ट कारणांनीं निरनिराळ्या धंद्यांतील मजुरी व नफा यांमध्यें कायमचा फरक दिसून येतो.
 दुस-या पुस्तकामध्यें भांडवल, त्याची वाढ व त्याची सुस्थिति यासंबंधाचें विवेचन आहे. भांडवलाचे दोन प्रकार आहेत. एक स्थिर भांडवल व दुसरें चल भांडवल. यंत्रसामग्री, कारखान्याच्या इमारती वगैरे, शेताची कायमची सुधारणा धद्याचें व कलांचें ज्ञान हें स्थिर भांडवल होय. चल भांडवल म्हणजे पैसा, कारखानदाराच्या ताब्यांतील अन्नसामग्री, कच्चा माल व कारखानदाराच्या हातांतला पक्का माल. देशाच्या पैशाची दरवर्षी होणारी मोडतोड व झीज हीं भरून काढणें बरेंच खर्चाचें काम असतें, म्हणून देशांत व्यापारी पत, विश्वास व सचोटी यांचा उदय झाल्यावर कागदी चलन सुरू होतें व त्याचे योगानें बराच खर्च वांचतो, या पुस्तकाच्या शेवटीं अॅडाम स्मिथनें स्वाभाविकपणें उद्योगधंद्याच्या पाय-या कशा लागतात व देशांत वाढणारें भांडवल स्वाभाविक तऱ्हेनें कशा क्रमानें निरनिराळया धंद्यांत गुंतविलें जाईल हें सांगितलें आहे. अॅडाम स्मिथच्या मतानें भांडवल प्रथमतः शेतकींत जाईल. कारण तेथें सृष्टि मानवी श्रमाला मदत करीत असते. म्हणून या उद्योगांत फारच फायदा असतो. नंतर कारखाना, नंतर देशी व्यापार, मग परदेशी व्यापार व शेवटीं परदेशी अप्रत्यक्ष व्यापार, हा धंद्याच्या वाढीचा नैसर्गिक ऋम आहे
 या दोन पुस्तकांत अॅडाम स्मिथनें अर्थशास्त्राचा तात्विकदृष्ट्या विचार केला आहे व पुढील अर्थशाखकारांनीं अॅडाम स्मिथच्या विवेचनांतील याच तात्विक भागांत कोठें भर घातली आहे तर कोठें त्याच्या मतांत फरक केला आहे<br.>  अॅडाम स्मिथचें तिसरें व चौथें पुस्तक हीं ऐतिहासिक आहेत. तिस-यामध्यें युरोपांत निरनिराळ्या धंद्यांची व एकंदर संपत्तीची वाढ कशी व कोणत्या कारणानें झाली याचा इतिहास दिला आहे. चैौथ्यांत आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या पंथांची हकीकत देऊन त्यांच्यावर टीका केली आहे. यामध्यें विशेषतः उदीमपंथाच्या हेतूचें व त्यांच्या साधनांचें सविस्तर