पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/309

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[२९७] कारणे म्हणजे मागणी व पुरवठा होत.तेव्हां या कल्पनांचे शास्त्रीय अर्थ ठरवून त्याचे नियम काय हे ठरविलें पाहिजे. ते पुढील भागांत केल्यानंतर मग पदार्थाच्या मूळ किंमतीच्या कारणांकडे वळण्यास सोईचे होईल. भाग तिसरा, बTजार व त्याची उत्क्रांति ज्याप्रमाणे विनिमय, अदलाबदल अगर देवघेव हे शब्द उच्चारतांच मोलाची अगर किंमतीची कल्पना मनांत येते, त्याचप्रमाणे बाजाराची कल्पनाही मनांत आल्याखेरीज रहात नाही. कारण विनिमय अगर देवघेव ही बाजारात चालते. तेव्हां अर्थशास्त्रदृष्टया बाजार म्हणजे काय व त्यांत कोणत्या विशेष गुणाचा अन्तर्भाव होतो व या बाजाराची वाढ औद्योगिक वाढीबरोबर कशी झाली आहे हे या लहानशा भागांत पहावयाचे आहे. बाजार म्हणजे देवारी-घेवारी, दुकानदार,गिऱ्हाईक अथवा माल विकत घेणारे व माल विकत देणारे यांना एकत्र येण्यास सोईवार ठिकाण होय हें उघड आहे.अगदीं रानटी स्थितीमध्ये ज्या वेळीं मनुष्य असतो, त्या वेळी देशांत मुळीं संपत्तिच उत्पन्न होत नाही व जी कांही थोडीबहुत संपत्ति मनुष्य उत्पन्न करतो ती स्वतःकरितां व स्वतःच्या कुटुंबाकरितां करतो. अशा स्थितींत अदलाबदलीस अवसरच नसतो व म्हणून बाजार ही संस्था उत्पन्न होऊ शकत नाही. परंतु समाजामध्ये श्रमविभाग उत्पन्न होऊन संपत्ति वाढू लागली म्हणजे अदलाबदलीची अवश्यकता उत्पन्न होते व मग बाजाराचीही अवश्यकता भासू लागते. पूर्वकाळी बाजाराची जागा व दिवस ही दोन्ही फिरती असत. म्हणजे गांवाच्या एका विवक्षित ठिकाणीं व आठवड्यांतील एखाद्या विवक्षित दिवशी बाजार भरत असत. फार प्राचीन काळी दोन खेडेगांवाना सोईच्या अशा ठिकाणीं बहुधा बाजार भरत असावा व तेथें दोन्ही खेड्यातील लोक आपआपला माल आणीत असावे व विकत घेणारेही ठरलेल्या वेळीं जमत असावे व तेथे संपत्तीची