पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/307

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[ २९५] आतां मनुष्याच्या कांहीं वासनांमध्ये कमीअधिकपणा होण्याचा गुण जास्त असतो तर कांहींमध्ये तो फार कमी असतो. उदाहरणार्थ, मनुष्याला लागणारें अन्न यामध्ये फारसा कमीअधिकपणा होत नाही. अन्न शरीररक्ष णाला सारखेच लागते व तें मनुष्याला विकत घेतलेच पाहिजे. परंतु या पलीकडे त्याचा मुळींच उपयोग नाही. यामुळे अशा वस्तु गरजेपलीकडे कोणीही जमविणार नाही. परंतु कपडेलत्ते, खुर्च्या, टेबले इत्यादि सामान्य वस्तू, चित्रसंग्रह, पुस्तकसंग्रह, वगैरेंसारख्या सुधारलेल्या समाजांतील गरजांना कहीएक नियतपणा नसतो. या वस्तू कितीही असल्या तरी मनुष्याला त्याची थोडीबहुत तरी गरज ( अनुद्भूत ) असते व असा माल स्वस्त मिळाला तर मनुष्य विकत घेतो. म्हणजे येथे त्याला या अधिक वस्तूंची उपयुक्तता पुष्कळ कमी असते व म्हणून तो त्या वस्तूला किंमत कमी देतो. वरील विवेचनावरून असे दिसून येईल कीं, पदार्थाला जें मोल अगर जी किंमत आपण बजारांत देतों ती आपल्याला सर्वात कमी उपयोगी जो पदार्थाचा अवशेष असेल त्यावरून ठरवितों व ती त्या सर्व पदार्थाची किंमत अगर मोल होय.यालाच जेव्हन्स यानें आवशेषिक उपयुक्तता म्हटले आहे. या उपपत्तीचा उद्देश उपयुक्तता या कल्पनेला किमतीप्रमाणे विशिष्ट परिमाणाचे स्वरूप आणण्याचा होता. असें उपयुक्ततेला विशिष्ट परिमा णाचे स्वरूप आलें म्हणजे उपयुक्तता ही एक गणनार्ह कल्पना होईल व असे झालें म्हणजे अर्थशास्त्राच्या नियमांना गणितशास्त्राच्या प्रमेयासारखे निश्चित स्वरूप देतां येईल अशी जेव्हन्सची कल्पना होती. या कल्पनेनु रूप जेव्हन्सनें अर्थशास्त्रामध्ये गणितांतल्यासारखीं परिमाणरूप सुत्रे काढ ण्याचा प्रयत्न केला आहे खरा. आतां किंमत ही कल्पना विशिष्ट स्वरूपाची आहे खरी; व बाजारांत वस्तूचे भाव ठरतात ते कांहीं नियमित कारणांनीं ठरतात हेंही खरे; परंतु मानवी वासना ही चंचल मानसिक गोष्ट असल्यामुळे तिला नियत परिमाणरूप देण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे.ती मनुष्यामनुष्यामध्ये बदलत राहणार. व तिची मोजदाद झालीच तर ती फक्त ढोबळ रीतीनेच होणार हैं विसरतां _e.