पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/303

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२९१ ॥ एक वस्तु विकत घेण्याकरितां त्याच्या मोबदला द्यावी लागणारी वस्तु ही त्या पहिल्या वस्तूचे विनिमय-मोल होय. व अर्थशास्त्रांत हाच अर्थ महत्त्वाचा आहे. अँडाम स्मिथने याप्रमाणे मोल या शब्दांतील संदिग्धता दाखवून मोल शब्दाचा दुसराच अर्थ ग्राह्य धरला आहे. परंतु अँडाम स्मिथच्या मोल या शब्दार्थाच्या पृथक्करणाने जास्तच गोंधळ उत्पन्न झाला आहे. कारण उपयुक्तता-मोल हा शब्दप्रयोगच मुळीं घोटाळ्याचा आहे. याचा सरळ अर्थ म्हणजे उपयुक्तता एवढाच होत. वास्तविक पाहतां मोल हें उपयुक्ततेचें कार्य आहे. व अॅडाम स्मिथच्या उपयुक्तता-मोल या शब्दामध्ये कार्यकारणांचे एकीकरण झाले आहे. यामुळेच अँडाम स्मिथच्या विवेचनाने मोलाची कल्पन स्पष्ट होण्याऐवजी जास्तच घोंटा ळ्याची होऊन गेली आहे. म्हणून वर मोलाची व्याख्या करतांना अंडाम स्मिथच्या या भेदाचा उल्लेख केला नव्हता. असो. परंतु ‘ वस्तुला मोल कां येतें हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे व याच्या उत्तरामध्येच वादाचे मूळ आहे. कारण या प्रश्नाला परस्परविरोधी अशी दोन उत्तरें अर्थशास्त्रकारांनी दिलेली आहेत व त्या उत्तरांवरून या संबंधांत दोन वाद अगर कल्पना उत्पन्न झाल्या आहेत. मालाला मोल कां येतें ? या प्रश्नाचे उत्तर कांहींनी खालील कारण मीमांसेने दिले आहे .संपत्ति, माल, पदार्थ किंवा वस्तू या मानवी वासना तृप्त करितात म्हणजे त्या मनुष्याला उपयोगी आहे व त्या उपयोगी आहेत म्हणून या मोलवान आहेत अगर त्यांना मोल येते. अर्थात् वस्तूच्या मध्यें उपयुक्तता आहे म्हणूनच मनुष्य त्या वस्तूच्या प्राप्तीकरितां कांहींतरी मोबदला देण्यास तयार होते. म्हणजे त्या वस्तूला मोल येतें अगर ती मोलवान् ठरते. तेव्हां वस्तूचें मोल त्याच्या उपयुक्ततेवर अवलंबून आहे असे होते . अर्थात् मोल व उपयुक्तता यांमध्ये कार्यकारणभाव आहे असे ठरते. यालाच मोलाबद्दलचा उपयुक्ततावाद म्हणतात व या मताप्रमाणे जितकी जितकी वस्तूची उपयुक्तता जास्त तितकें तितके त्याचे मोल जास्त असले पाहिजे असा सिद्धांत निघतो. परंतु हा सिद्धांत वस्तुस्थितीला धरून नाही असे दिसून येते. हवा, पाणी ही मनुष्याला अत्यंत उपयोगी आहेत; कारण त्यावाचून मनुष्य प्राण धारण करू शक णार नाही. परंतु जीविताच्या या अत्यंत उपयोगी–नव्हे अत्यंत अव -