पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/298

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[२८६ ] हकीकतीवरून कळतें. हे लोक त्यांच्या देशांत सांपडणारे सोन्यारुप्याचे तुकडे युरोपियन प्रवाशांपासून क्षुल्लक खेळणीं घेऊन त्याच्या बदला देत असत. परंतु सुधारलेल्या देशांत या पैशाकरितां मनुष्यें किती तरी धडपड करतात. वरील विवेचनावरून पैसा, त्यांचें स्वरूप, त्यांचें कार्य वगेरे प्रश्र जिज्ञासावर्धक आहेत हें उघड होईल. परंतु पैशाची परिणतावस्था यापेक्षांही जिज्ञासावर्धक व म्हणून मनोरंजक आहे. प्रत्यक्षपणें कोणतीच वासना तुप्र न करणारा पैसा समाजांत सर्वत्र पसरून तो सर्व औघोगिक प्रयत्नांचा विशेष होतो इतकेंच नव्हे तर औघोगिक प्रगतींत पुढारलेल्या समाजांत कागदी चलनाचा सर्वत्र प्रसार होतो. आतां कागदी चलन हैं पैशापेक्षांही जास्त विलक्षण दिसतें. एखाघा कागदी चिटो-याची हजारों रुपये किंमत असावी हें रानटी माणसाला ' बोलणाच्या धलप्या ? इतकेंच आश्र्चर्यकारक वाटावें हें साहजिक आहे. तेव्हा हा कागदी चलनाचा प्रक्ष हें चलन समाजांत कसें व कां प्रचलित होतें व सोन्यारुप्याच्या पैशापेक्षांही लोकांची मागणी त्याला जास्त कां होते हा प्रश्रही पहिल्याइतकाच जिज्ञासावर्धक असून मनोरंजक आहे. असो. पुढे पेढयांची संस्था, त्यानें होणारे पैशाशिवाय हजारों रुपयांचे व्यवहार वगैरे प्रश्रही कठीण पण मनोरंजकच आहेत. आणखी परदेशांतील व देशांतील प्रचंड व्यापाराच्या घडामोडी कशा होतात; विनपैशानें या घडामेोडीची व्यवस्था कशी होते; व्यापा-याच्या हातचीं साक-पत्रेंही पैशासारखीं वापरलीं कां व कशीं जातात: सोन्यारुप्याच्या वाढीचा देशात पैशावर कसा परिणाम होतो; राष्ट्राराष्ट्रांमधील पैशाचा स्वरुपाचे व्यवहार कसे होतात वगैरे किती तरी प्रश्रांचा या पुस्तकांत समावेश व हे प्रश्र कठीण पण मनोरंजक आहेत यांत शंका नाहीं. आतां या पुस्तकांतील विषयाचे सामान्यतः कोणकोणते पोट-भाग पडतात ते पाहूं; ह्राणजे क्रमानें त्यांचा विचार करण्यास ठीक पडेल. पहील्या विभागांत विनिमयाचें सामान्य स्वरूप व पदांर्थाचे मोल व किंमत यांतील फरक व पदांर्थाच्या किंमतीची मीमांसा इतक्या गोष्टी येतात. दुसऱ्यांत पैसा, त्यांचे स्वरूप, त्यांचे कार्य व तत्संबधी प्रश्र येतात; शिवाय त्यांतच पेढया व त्यांचें स्वरूप व कार्य कागदी चलन व त्याची मीमांसा इत्यादि प्रश्रांचा समावेश होतो. चवथ्यांत परराष्ट्रीय व्यापार व त्याचीं तत्व व तो घडवून आणण्याचीं साधनें या विषयांचा अन्तर्भाव होतो. याच