पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २८५ ] अगदीं परस्पर निगडित आहेत हेंही मागें दाखविलेंच आहे. तेव्हां त्याची आतां पुनरावृत्ति करण्याचें प्रयोजन नाहीं. परंतु हा विषय जितका महत्वाचा आहे तितकाच तो भानगडीचा व घोंटाळ्याचा आहे. कारण यांतलि प्रश्न अगदीं व्यावहारिक स्वरुपाचे आहेत. तसेंच यांतील पारिभाषिक शब्द हे सामान्य माणसाच्या परिचयाचे आहेत. परंतु यामुळेंच या शब्दांची योग्य शास्त्रीय व्याख्या ठरविण्याचें काम फारच कठिण आहे. खेरीज या विषयांत युक्तिवादाचा भाग जास्त आहे. वांटणीच्या विषयांत जितका वर्णनात्मक भाग आहे त्यापेक्षां या विषयांत वर्णनात्मक भाग फार कमी आहे. यामुळें येथें तर्कपद्धतीला अवसर जास्त आहे; व रिकार्डो यानें एकंदर अर्थशास्त्राची तार्किक पद्धति आहे असें जें प्रतिपादन केलें तें अर्थशास्त्राच्या या विषयाला जास्त लागू आहे. रिकार्डो हा स्वतः मोठा पेढीवाला होता. त्याला पेढीच्या व्यापाराची व परराष्ट्राच्या व्यापाराची प्रत्यक्ष माहिती होती व या विषयांत ज्या पद्धतीचा विशेष अवलंब करण्याचा प्रसंग येतो तीच पद्धति त्यानें अर्थशास्त्राच्या इतर विषयांसही लागू केली व म्हणून त्याच्या पुष्कळ उपपत्ति एककल्ली झाल्या, हें मागें दाखविलें आहे; परंतु या विषयांत युक्तिवाद व तार्किक पद्धतीचा विशेष उपयोग झालेला असल्यामुळें यांमध्यें वादग्रस्त प्रक्षही फार आहेत, व ह्राणून त्याला भानगडीचें व कठिणपणाचें स्वरूप आलेलें आहे यांत शंका नाहीं. मात्र या पुस्तकांतील विषय आतांपर्यंत प्रतिपादन केलेल्या विषयांपेक्षां सहज जिज्ञासा उत्पन्न करणारे असल्यामुळें ते जरी कठिण व भानगडीचे असले तरी कमी मनोरंजक नाहींत हें खास आहे. ज्यानें तहानभुक भागत नाहीं, जो शीतोष्णादि विकारांपासून मनुष्यांचे संरक्षण करूं शकत नाही; ज्यापासून स्पर्शघ्राणेंद्रियादि इंद्रियेसुखें र्मिळत नाहीत; सोरांश, ज्याच्यायोगानें मनुष्याची कोणतींच वासनावृत होत नाहीं ह्राणून रानटी मनुष्यास जी अगदीं निरुपयोगी पदार्थ वाटतो तो पैसा-सोन्यारुण्याचे तुकडे हैं-उघोगयुगांत संपतिसर्वस्व बनतो व त्याकरितां मनुष्य आटोकाट प्रयत्न करूं लागतात. इसावनीतींतील कोंवडा आणि रत्न या गोष्टीप्रमाणें रानटी मनुष्याला सोनेंरूपें या निरुपयेोगी व कमी किंमतीच्या वाटतात. याचें प्रत्यक्ष प्रत्यंतर आपल्याला अमेरिकेंतील रेड-इंडियन लोकांच्या