पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/288

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[ ૨૭૬ } श्रीमंत करण्यांत व गरिबांना जास्त गरीब करण्यांत होतो ह्मणजे संपत्तीच्या वांटणीची असमता तीव्रतरं होत जाते. कारण हल्लींच्या काळीं श्रम करून आपली सांपत्तिक स्थिति सुधारण्यास शिक्षणाची गरज असते. परंतु गरिबांना हें शिक्षण मिळवितां येत नाहीं. यामुळे त्यांना आपली स्थिति सुधारण्याचा मार्ग बंद झाल्यासारखा होतो. व त्यांचा पाय दारिद्यपंकांत जास्त जास्तच बुडत जातो.तेव्हां संपत्तीची वांटणी समतेची हाेण्याचा एक उपाय गरीबांना शिक्षणाच्या जास्त सवलती देणें हा होय. ` ह्मणजे होता होईल तों शिक्षणसंस्था राष्ट्रीयकरून त्या सरकारच्या खर्चातून चालविणें व शिक्षण जितकें स्वस्त करतां येईल तितकें स्वस्त करणें ही एक सामाजिकपंथी योजना आहे व मागें शिक्षणावर जे एक भाग लिहिला आहे त्यामध्यें त्याची सयुक्तिकता दाखविलीच आहे. तेव्हां येथें पुनः त्याची द्विरुक्ति करण्याचें प्रयोजन नाहीं. प्राथमिक शिक्षण–सामान्य व औद्योगिक-हे मोफत व सक्तीचें केलें पाहिजे अशी बहुतेक सुधारलेल्या सरकारची समजूत झालेली आहे. परंतु सर्व प्रकारचें शिक्षण होतां होईल तितके स्वस्त अगर अगदीं मोफत करणें हें सरकारचें कर्तव्यकर्म आहे ही जाणीव सरकारच्या मनांत अझुन उत्पन्न झाली नाहीं. परंतु अशी जाणीव उत्पन्न झाली ह्मणजे ही सामाजिकपंथी योजनाही पसंत झाल्यासारखें होईल. राहतां राहिली एक राष्ट्रीय सामाजिक-पंथी योजना. या योजनेला मृत स्वरूप प्रथमतः जर्मनीमध्यें मिळालें व त्याच्या पुरस्कर्तृत्वाचा मान प्रसिद्ध जर्मन मुत्सद्दी प्रिन्स बिसमार्क याला आहे हें मागल्या भागांत सांगितलेच आहे. आतां या योजनेचें विशेष स्वरूप, त्याची अंमलबजावणी व त्यावर आणले जाणारे आक्षेप यांचा विचार करावयाचा आहे. घरगुती उद्योगपद्धति व विराटस्वरूपी उद्योगपद्धति याचा एक परिणाम असा होतों कीं, देशांतील बहुजनसमाज हा निवळ दिसमजुरी मिळवणारा मजूर बनताे. त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचें भांडवल नसते व त्याच्या आजारीपणांत किंवा अपघातांत किंवा वार्धक्यामध्यें त्याचे उत्पन्न अजीबाद बंद होते. कारण मजुराला गिरणींत किंवा कारखान्यात जातां आलें नाहीं, म्हणजे मजुरी बंद आणि मजुरी बंद म्हणजे त्यांचे उत्पन्न बंद. घरगुती उद्योगपद्धतींत त्यांचे भांडवल थोडेें तरी असते. व त्यावर त्या कामगारांचीं घरची माणसें काम करूं शकतात किवा शेजा-यापाजा-याच्या