पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/280

विकिस्रोत कडून
येथे जा: सुचालन, शोध
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[ ૨૬૮] यामुळे समाजांत जर कोठें दुःख व असमता उत्पन्न होत असेल. तर त्यांचा होतां होईल तितका प्रतिकार करणें या गोष्टीचा सरकारच्या कर्तव्यमर्यादेंत अन्तर्भाव होतो असें अर्वाचीन मत आहे. म्हणून अशा प्रकारचे कायदे सुधारलँलें सुरकार बेधडक करूं लागले आहे. यामुळे सामाजिक योजना जोरानें पुढे आल्या आहेत,व त्यांपैकीं पुष्कळांचा सरकारास स्वीकारही करावा लागत आहे .

 येथपर्यंत सामाजिक पंथाच्या निरनिराळ्या पोटभेदांच्या सामान्य धोरणांचा व त्यांच्या सामान्य परिणामांचा विचार केला, आतां सामाजिक पंथांनीं सुचविलेल्या कांहीं विशिष्ट योजनांचा व उपायांचा विचार करावयाचा राहिला. तेवढा झाला म्हणजे या पुस्तकाचा कार्यभाग आटोपला.
या सर्व विशिष्ट योजनांपैकीं पुष्कळ सामाजिक पंथी-लोकांची आवडती योजना म्हणजे देशांतील सर्व जमीन सरकारी मालकीची करण्याची योजना होय. ही योजना रिकार्डोच्या जमिनीसंबंधींच्या भाडयाच्या उपपत्तीचा साक्षातू परिणाम होय. यासंबंधीं इंग्लंडमध्यें मिस्तर वॉलेस व हेन्री जॉर्ज या दोन लेखकांच्या पुस्तकांनीं बरीच चळवळ उडवून दिली होती. मिल्ल यालाही या योजनेंतील मुख्य तत्व कबूल होते व या तत्वानुरूप इंग्लंडमध्यें जमिनीच्या बाबतींत सुधारणा घडवून आणण्याची चळवळ करण्याकरतां इंग्लंडमध्यें एक सभा स्थापन झाली होती व त्याचें अध्यक्षस्थान भिल्लकडेचं होतें. देशांतील सर्व जमीन सरकारी मालकीची करण हा या सर्व खटपटीचा हेतु होता व सामाजिक पंथाला ही वाव फारच महत्वाची वाटत असे. कारण त्याचे मतें समाजांत संपत्तीच्या वांटणीच्या विषमतेचें-पर्यायानें बहुजनसमाजाच्या अत्यंत दारिद्याचें एक प्रमुख कारण ह्मणजे जमिनीवरील खासगी मालकी ही होय. कारण रिकार्डोच्या उपपत्तीप्रमाणें देशाच्या लोकसंख्येच्या वाढीबरोबर व तिच्या भरभराटीबरोबर जमिनीचा खंड वाढत जातो व खासगी मालकीच्या संस्थेमध्यें हा वाढता खंड ह्मणजे जमीनदारांचें वाढतें उत्पन्न होय. हें उत्पन्न मिळविगाण्यास किंवा वाढविण्यास जमीनदारांना कांहीं एक श्रम करावे लागत नाहींत व कांहीं एक श्रम न करतां जमीनदारांना देशांतील संपत्तीचा वाढता वांटा मिळत जातो. हें सामाजिक-पंथी लोकांना मोठं वैषम्य वाटतें. मजूरलोक रात्रंदिवस श्रम करतात व जीवापाड खपतात तरी