पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/278

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ૨૬૬] मालकीचीं पाहिजे आहेत. म्हणजे प्रत्येक मनुष्यानें सरकारी नोकर व्हावें व प्रत्येक धंदा ह्मणजे एक सरकारी खातें बनावें ही त्याची इच्छा. अशा स्थितींत सर्व लोकांमध्यें संपत्तीची वांटणी प्रत्येकाच्या गुणानुरूप होईल व समाजांत श्रीमंत परंतु आळशी असा वर्गच दृष्टीस पडणार नाहीं. कारण कोणत्याही माणसाला काम केल्याखेरीज पगारच मिळणार नाही. या पंथाच्या योजनेचा परिणाम समाजांतील स्वावलंबन व समाजांतील व्यक्तिविशेषत्व नाहीसें करण्यामध्यें होणार हें उघड आहे. असा समाज म्हणजे कायद्यानें जखडलेला व रुढिंबद्ध असा समाज हेोईल व समाजांतील प्रगतीचें मूळ जे व्यक्तींतील विशेष गुण त्यांची वाढ अगदीं खुंटेल. शिवाय या पंथाच्या कल्पनेमध्यें सरकार व प्रजा यांमध्यें विलक्षण फरक असतो असें गृहीत धरलें आहे. समाजांतील सरकार हैं सर्वज्ञानी, सर्वस्वी शहाणें, मूर्तिमंत न्यायदेवता आहे असें समजलें पाहिजे. व म्हणून सरकारच्या करणीमध्यें असमता किंवा इतर दोष राहणार नाहीं. परंतु ही कल्पना वस्तुस्थितीस धरून नाहीं. याला अपवादादाखल प्रकार म्हणजे अत्यंत रानटी व पशुवृत्ति लोकांवर अत्यंत सुधारलेल्या चिमुटभर परोपकारी लोकांचा अंमल असणें हा हाेय. अशा ठिकाणीं सर्व गेटी सरकारनें हाती घ्याव्या लागतील हैं खरें अहि, व समाजाच्या हिताच्याही दृष्टीनें तीच गेष्ट श्रेयस्कर आहे. परंतु ही स्थिति अपवादादाखल अाहे. सामान्यत: राजा व प्रजा ही एकाच दर्ज्याची असलीं पाहिजेत व औद्योगिक व्यवसाय सरकारच्या हातीं दिल्यानें समाजाची औद्योगिक प्रगति होऊन सर्व लोक सारखे सुखी होतील असें मानण्यास जागा नाहीं. मात्र हल्लींच्या संपत्तीच्या उत्पादनांत व्यक्तीकडे जबाबदारी असल्यामुळे व त्यावरच व्यक्तीचा नफा अवलंबून असल्यामुळे जी कळकळ, जो हुरूप व जी अंगमेहनत औद्योगिक बाबतींत दाखविली जाते ती कळकळ, ते हुरुप व ती अंगमेहनत समाईक उद्योगपद्धतींत दाखविली जाणार नाहीं व औद्योगिक बाबतींत त्या समाजाचें पाऊल मागें पडेल व हल्लीं समाजांतील कांहीं वर्ग तरी सुसंपन्न आहेत ते नाहींसे होऊन सर्व समाजांत सररहा दैन्यावस्था व दारिद्र्यातील समता पसरेल. तेव्हां या पंथाच्याही योजना युक्तीस जुळणा-या नाहींत.

 व्यक्तिक सामाजिक पंथाच्या योजनाही समाजाला बाल्यावस्थेप्रत