पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२६३] मालकी व त्यांतून येणारें अनुपार्जितं उत्पन्न ही होय. तेव्हां अशा ठिकाणीं सरकारकडे मालकी असणें अवश्य आहे असें राष्ट्रीय सामाजिक पंथी ग्रंथकारांचें मत आहे. या बाबतींत वागनरनें खालील रचना आपल्या ग्रंथांत नमूद केली आहे. १ सरकार किंवा सार्वजनिक संस्था यांच्याकडे देशांतील सर्व जंगलाची मालकी असावी. कारण या स्थावर उत्पन्नांत अनुपार्जित वाढ पुष्कळ असते. व ही वाढ सरकारला मिळाल्यानें लोकांवरील एकंदर कराचा बोजा कमी होतो. २ लागवडीच्या जमिनीसंबंधानें मोठमोठ्या इस्टेटी थोडया लोकांच्या हातांत गेल्यामुळेच जमिनाचा सार्वजनिक उपयोग कमी होती. तेव्हां देशांत मिरासदार अल्पशेती करणारे असावे व त्यांना जमिनीचें पूर्ण स्वातंत्र्य यावें.

३ शहरांतील जमिनीवर मात्र खासगी व्यक्तीची मालकी कधीच असू नये. अशा मालकीनें जमिनीच्या किंमती कल्पनातीत वाढतात व शहरांत राहणा-या गरीब लोकांना घरें मिळणें फार मुश्किलीचें होतें.

४ दळणवळणाचीं साधनें हाणजे रस्ते, रेल्वे, कालवे हे सर्व सरकारच्या मालकीचे असावे. रेल्वेचा उद्देश उत्पन्न मिळविण्याचा नसावा तरं लोकांना स्वस्त प्रवासाचीं साधनें मिळवून देण्याचा असावा. राष्ट्रीय रेल्वे केल्यानें रेल्वे कंपन्यांना रयतेला बुचाडण्यास सांपडणार नाहीं व जी कांहीं उत्पन्नाची अनुपार्जित वाढ होईल तिचा फायदा सर्व समाजास मिळेल. ५ रॉकेल, मीठ, कोळसा वगैरेंसारख्या सामान्य उपयोगाच्या वस्तूच्या खाणी सरकारच्या ताब्यांत असाव्या. वागनर हा भिन्सु बिसमार्कचा प्रमुख सल्लागार होता हें वर सांगितलेंच आहे व यामुळें वागनरच्या पुष्कळ कल्पनांपैकीं बराच भाग जर्मन सरकारनें आधींच हातीं घेतलेला आहे.

वरील विवेचनावरून सामाजिक पंथाच्या साही पोटभेदांपैकीं राष्ट्रीय सामाजिक पंथाचा सुधारलेल्या सर्व सरकारावर बराच पगडा आहे असें दिसून येईल व त्या पंथाच्या कल्पनांपैकी ब-याच सुसाध्य आहेत हे पुढल्या भागांतील हकीकतीवरून दिसून येईल.