पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/273

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

[२६१]

वरील उता-यावरून अराजकपंथाचें उद्दिष्ट स्पष्टपणें दिसून येतें त्यांना हृल्लींच्या समाजांतील सर्व संस्था व सत्ताप्रकार हे जुलुमाचे व अन्यायाचे वाटतात व ते नाहीसे झाल्याखेरीज मनुष्यांना खरें सुख व खरें स्वातंत्र्य मिळणार नाहीं असें त्यांना वाटतें व हें साधण्याकरितां ते सर्वप्रकारच्या क्रांतिकारक उपायांचा अवलंब करण्यास मागें पुढें पहात नाहींत.
रशियामध्यें विध्वंसक जो पंथ निर्माण झाला आहे त्याची व अराजकपंथाचीं तत्वें सामान्यतः सारखीच आहेत; त्यांचे मार्गही बहुधां सारखेच आहेत. परंतु विध्वंसक पंथ अराजक पंथापेक्षां जास्त जोरदार असून पाहिजे त्या क्रांतिकारक मार्गाचा स्वीकार करण्यास तयार असतो इतकेंच; अराजक पंथाचा प्रवर्तक बुकानन याचें या विध्वंसकपंथी लोकांवरही फार वजन असे. अराजकपंथाचा उद्देश हल्लींच्या समाजसंस्था नाहीशा करून त्यांचे जागीं मनुष्याची सृष्टि-स्थिति आणण्याचा आहे तर विध्वंसक पंथाचा उद्देश निवळ सद्यःस्थिति नाहींशी करण्याचा आहे.
रशियाच्या विशेष परिस्थितीमुळे हा पंथ तेथें फार जोरावला व त्यामुळें त्याला एक स्वतंत्र नांव मिळालें, परंतु तात्विकदृष्ट्या अराजक व विध्वंसक पंथांत फारसा फरक नाहीं. तेव्हां या पंथाचे आणखी विवेचन करण्याचें प्रयोजन नाहीं.
क्रांतिकारक मार्गाचा अवलंब करणारे सामाजिक पंथ तसेच समाईक पंथ व संयुक्त सामाजिक पंथ या सर्वांचे उद्देश समाजाची पुनर्घटना करण्याचे आहेत. या सर्वांना समाजाच्या मुख्य संस्थाच मुळीं अनिष्टकारक वाटतात. परंतु त्यांच्या समाजाच्या पुनर्घटनेच्या कल्पना शक्य कोटींतील नसल्यामुळे या 'पंथाच्या हातून प्रत्यक्ष कल्याणकारक गोष्टी झाल्या नाहींत व समंजस माणसाचा पाठिंबा या पंथांना मुळींच नाहीं म्हटलें तरी चालेल.
परंतु जो सामाजिक पंथ बराच शक्य कोटींतील आहे व ज्या पंथाची छाप दिवसेंदिवस थोडया फार अंशानें सर्व सुधारलेल्या सरकारावर पडत आहे तो पंथ म्हणजे राष्ट्रीय सामाजिक पंथ होय. या पंथाचा उदय जर्मनीमध्यें झाला. त्या देशांत क्रांतिकारक सामाजिक पंथाचा प्रसार फार होऊं लागला. त्यावर मारक म्हणून जर्मनींतील सरकार व त्याचा प्रसिद्ध मुत्सद्दी प्रिन्स बिसमार्क यांनीं राष्ट्रीय सामाजिक