पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २५८ ] परंतु या शोधांचा सर्व फायदा मात्र भांडवलवाल्यांना मिळतो. औद्योगिक सुधारणेचा स्वाभाविक परिणाम म्हणजे मजुरांची मजुरी कमी होणं, त्यांच्या कामाचे तास वाढणें, मजुरांच्या अर्ध्या वर्गाला फाजील श्रम पडणें, बाकीचे निकामी राहणें व शेवटीं सर्व जास्त मोलाचा सांठा थोड्याशा भांडवलवाल्यांच्या हातीं जाणें हा होय. औद्योगिक सुधारणेचा परिणाम श्रमाची मजुरी कमी करण्यांत होती. कारण या सुधारणेनें बौद्धिक, नैतिक, शारीरिक गुणांची फारकत होते. यांनीं विशेष मेहनतीचीं कामें कमी होतात व म्हणून कारखान्यांत बायका व मुले यांचे श्रम पसंत केले जातात. कारण तितक्याच मजुरींत सर्व कुटुंबाचे श्रम मिळतात. दुसरें, औद्योगिक सुधारणा कामाचा दिवस वाढविते. कारण यंत्रं हीं रात्रंदिवस चालुशकतात, व भांडवलवाल्यांनीं मजुरांच्या श्रमाचा काळ ५ मिनिटांनीं वाढविला तरी त्यांचा किती तरी फायदा वाढतो. मोजकामाची पद्धत मजुरांना फार घातक आहे. कारण मजुरांना जास्त काम करण्याचा मोह होतो व भांडवलवाल्याला अमुक वेळांत अमुक काम होतें याचा अंदाज कळतो व मग तो तितकेंच काम दिसमजुरांकडून करून घ्यावें अशी इच्छा करतो व तसें झालें नाहीं म्हणजे त्यांना घालवून तरी लावती नाहीं तर त्यांना मजुरी तरी कमी देतो. याप्रमाणें मोजकाम हें थोड्याशा मुजुरांना फायदेशीर असलें तरी मजुराच्या सर्व समूहास फार घातक आहृ. लोकसंख्येच्या वाढीची सापेक्षता-मार्क्स ह्वा मॅलथसचा अनुयार्थी नाही. त्याचें म्हणणें असें आहे कीं, प्रत्येक देशाचा लोकसंख्येचा नियम वेगवेगळा आहे. एकंदर लोकसंख्यावाढीची भीति निराधार आहे.हल्लीची दृश्य लोकसंख्येची फाजील वाढ ही सापेक्ष वाढ आहे. म्हणजे प्रचंड भांडवलाच्या पद्धतीचा तो परिणाम आहे. कारण या पद्धतीनें समाजांतील अर्ध्या लोकांना सगळ्या लोकांचें काम करावें लागतें. जर कामांची योग्य वांटणी केली तर सर्वांना भरपूर काम मिळेल. परंतु यंत्रांचा प्रचार, व्यापारी संकटें व लोकांच्या अभिरुचीमधील फरक या कारणांनीं पुष्काळ कामकरी निकामी होतात व म्हणून मजुरांमध्यें मजुरीकरितां चढाओढ होते व त्याच्यायोगानें मजुरीचे दर कमी होतात. प्रत्येक देशांत मजुरांचे दोन वर्ग असतात; एक निकामी मजुरांचा व एक कामकरी मजु