पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/268

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[ રદ્દ ] : विनिमयमोलाच्या रूपानेच दृग्गोचर होतें. तेव्हां विनिमयमोोल म्हणजे काय? एका उपयुक्त पदार्थाची दुसया उपयुक्त पदार्थाशी ज्या परीमाणार्ने अदलाबदल होते त्यावर विनिमयमोल अवलंबून आहे. व हें परिमाण पदार्थाच्या उपयुक्ततेवर मुळींच अवलंबून नाहीं. कारण उपयुक्तता हा गुण आहे तर परिमाण ही संख्या आहे. दुसरें उपयुक्ततेच्या दोन प्रकारची तुलना करतां येणें अशक्य आहे. कारण त्या अतुल आहेत. शिवाय पुष्कळ उपयुक्त पदार्थाना विनिमयमोल नाहीं, उदाहरणार्थ हवा, पाणी, नवी जमीन. तेव्हां ज्या पदार्थाना विनिमयमोल आहे त्या सर्वांमध्यें असणारा सामान्य गुण म्हणजे त्याची कष्टसाध्यता किंवा श्रमसाध्यता होय. आतां श्रम ही मोजण्यासारखी गोष्ट आहे आणि पदार्थाचें मोल तो उत्पन्न करण्यास लागलेल्या श्रमाच्या परिमाणावर अवलंबून आहे. व श्रमाचें परिमाण म्हणजे श्रमाचा काल होय. यावरुन खरेे मोल श्रमाचा काल व पदार्थाची उत्पत्ति यांच्या संबंधावरून निष्पन्न होतें. मजुराला प्रत्यक्ष लागलेल्या वेळावरून वस्तूचें मोल ठरवावयाचें नाहीं हें उघड आहे. कारण एक मजूर दुस-यापेक्षां जास्त आळशी असेल. परंतु त्या काळीं उपलब्ध असलेल्या साधनाचा उपयोग करून सरासरीनें जितके श्रम पदार्थाच्या उत्पत्तीस लागतील त्यावर मोल अवलंबून आहे. व ही सरासरी एका धंद्यांतील मजुरांची संख्या व त्यांनीं उत्पन्न केलेल्या सर्व मालाची संख्या याच्यावरून काढावयाची. याप्रमाणें मार्क्सच्या विवेचनाचा सिद्धांत हा कीं, पदार्थाचें मोल म्हणजे मालामध्यें सांठवून ठेवलेले श्रमाचें परिमाण होय. या मोलाच्या मीमांसेवर ट्रेन आक्षेप येतात. पहिला हा की, या उपत्तिप्रमाणें ज्या वस्तूला श्रम पडलेले नाहींत तिला मोल असतां कामा नये; व दुसरा हा की, ज्या ज्या वस्तूला श्रम लागले आहेत तिला मोल असलें पाहिजे. पहिल्या आक्षेपाला मार्क्सने मोल व किंमत. यांच्या भेदाच्या साहाय्यानें उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या जमिनीला श्रम लागलेले नाहीत व म्हणून तिला मोल नाही; परंतु तिला किंंमत आहे. दुस-या आक्षेपाला मार्क्सचें असें उत्तर आहे कीं, जें श्रमाचे फळ करणाराला किंवा दुसऱ्याला निरुपयोगी आहे त्याला मोल नाही