पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/267

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[ રખબ ] म्हणजे पैसा होय. भांडवलवाले आपल्या स्वतःच्या उपयोगाकरितां संपति उत्पन्न करीत नाहींत, तर दुस-याच्या उपयोगाकरितां ती उत्पन्न करितात. अर्थात आपली संपत्ति वाढविण्याकारिता ती दुस-यास विकतात. संपत्तीची वाढ कशी होते व ती कोठून होते हे]। शोधून काढणें हा मार्क्सच्या पुस्तकाचा मुख्य पप्रश्न आहे. विनिमयानें पदार्थाचें मोल वाढत नाहीं. कारण समान मोलाच्या वस्तूची अदलाबदल म्हणजे विनिमय होय. विनिमयानें पदार्थाची उपयुक्तता वाढेल. कारण विनिमयांत आपल्याला नको असलेल्या वस्तूची आपल्याला पाहिजे असणा-या वस्तूशीं आपण अदलाबदल करतों; परंतु ही समसमानाची अदलाबदल असते. तसेंच मोलाची वाढ भांडवलादि जड साधनांपासून होत नाहीं तर · ती मानवीश्रमापासून होते. खरोखरी पाहतां पदार्थीच्या मोलाची वाढ म्हणजे मजुरांच्या अवश्यक उपजीविकेच्या साधनाचे मोल व मजुरांच्या श्रमानें उत्पन्न केलेल्या पदार्थाचें मोल यांमधील वजाबाकीनें होते व ही सर्व मोलाची वाढ हल्लींच्या उद्योगपद्धतींत भांडवलवाले लाटतात. मार्क्सने आपल्या ग्रंथाच्या पुढील भागात त्यांच्या श्रमाचीं फळे मजूरवर्गापासून कोणकोणत्या मार्गानीं हिरावून नेली जातात याचें विवेचन केलें आहे. माक्सचें विवेचन अर्थशास्त्रांतील दोन प्रमेेयांवर बसविललें आहे. तीं प्रमेयें हीं:-श्रमापासून मोलाची उत्पत्ति होते. अर्थात उत्पत्तिच्या खर्चावर मालाची स्वाभाविक किंमत अवलंबून असते. व श्रम उत्पन्न करण्याच्या खर्चावर मजुरांची स्वाभाविक मजुरी अवलंबून असते; म्हणजे मजुरांच्या उपजीविकेला जितका खर्च अत्यंत अवश्यक आहे त्या मानानें त्यांची मजुरी असते. मार्क्सने आपलीं मर्त खालीं दिलेल्या सदरांत प्रतिपादन केलीं आहेत. मोल--विनिमय मोल व उपयुक्तता मोल असे मोलाचे दोन भेद करतात, परंतु वस्तूचें खरें मोल या दोहोंपेक्षांही भिन्न आहे. कारण उपयुक्तामोल म्हणजे केवळ उपयुकता होय. व दुसरें आपल्याला लाग- गाणा-या वस्तु जेथें मनुष्य स्वतः तयार करतो अशा समाजाच्या बाल्यावस्थेेत किंवा जेथें सर्व वस्तु समाईक गणल्या जातात तेथे विनिमयमोल याला आस्तित्वच नसतें. परंतु हे खरें की अर्वाचीन समाजांत मोल हें