पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ RR82] पासून सुटका करून घेण्याची कामक-यांची इच्छा आहे व यांतून सुटण्याचा मार्ग म्हणजे सर्व भांडवल सरकारचें करणें हा होय. या हेतुं सिद्धीच्या मार्गातील पहिली पायरी म्हणजे सरकारच्या पतीच्या साहाय्याने कामकरी लोकांचे धनोत्पादक संघ बनविणें होय. हीच लॅझेलीची सामाजिक पंथी योजना होती. लॅॅझेलीच्या मताप्रमाणें प्रत्येक राष्ट्रांतील मजूरदारांनीं आपआपली स्थिति सुधारण्याचे मार्ग काढावे म्हणून त्याची चळवळ राष्ट्रीय होती. परंतु त्याच्या पश्चात हा निर्बध टिकला नाहीं. लॅझेलीच्या अनुयायांनीही चळवळ सार्वराष्ट्रीय केली मार्क्स या ग्रंथकाराचा ' भांडवल हा ग्रथ म्हणजे अर्वाचीन सामाजिक पंथाचा पवित्र ग्रंथ होोय. या पुस्तकामध्यें त्याचीं सर्व प्रमाणें गोवलेली आहेत. हा ग्रंथं मोठ्या कुशलतेनें लिहिला आहे यांत शंका नाहीं. त्यावरून ग्रंथकर्त्यांची विचारशक्ति, त्याचें अर्थशास्त्राच्या वाड्मयाचें ज्ञान, त्याची शोधकबुद्धि व तार्किक पृथकरण-बुद्धि चांगली व्यक्त होते. परंतु ग्रंथामध्यें कांहीं दोषही आहेत. आधीं भाषा चांगली नाहीं. शिवाय साध्या व स्पष्ट गोष्टीवर पाल्हाळ केला आहे; तर वादग्रस्त मुद्दे गृहीत धरले आहेत. भांडवला 'चा उदय व त्याचे सामाजिक परिणाम हा या ग्रंथाचा विषय आहे. मार्क्सने ‘ भांडवल याचा अगदीं निराळाच अर्थ घेतला आहे. भावि उत्पत्तीकरितां शिल्लक टाकलेली संपत्ति म्हणजे भांडवल होय असा सामान्यतः अर्थशास्त्री त्याचा अर्थ करतात. या अर्थाने शेतकऱ्याजवळ असलेली साधनें व उपकरणें यांचा भांडवलांत अन्तर्भाव होतो. पूर्वी मजुरांच्या हातच भांडवल असे. शेतकरी आपल्या उपभोगावयाच्या संपत्तीमधून बियाणें व इतर साधनें मागे टाकी. शेतकरी आपल्या स्वतःच्या उपभोगाकरितां संपत्ति उत्पन्न करी व भांडवल श्रमाच्या हवाली होतें. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर व व्यापाराच्या स्वतः संपत्तीच्या उत्पादक धंद्यांत न पडणा-या परंतु आपलें भांडवल कारखानदारांंना कर्जाऊ देणा-या लोकांच्या हातांत गेलं व कारखानदार मजुरांना कामावर घेऊं लागले. मार्क्सच्या मताप्रमाणें भांडवल म्हणजे निव्वळ पैसा होय. संपत्तीच्या वाढीकडे "उपयोग केलेली संपत्ति