पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २५३] शेवटीं मालमत्ता मिळविण्याचा हक्क असल्याशिवाय मनुष्याला खरें स्वातंत्र्य मिळालें असें म्हणता येणार नाहीं. सारांश, कामदारांच्या चळवळीचा हेतु व्यक्तीला खरें स्वातंत्र्य मिळवून देण्याचा आहे. समता हा कांहीं त्याचा प्रधान हेतु नाहीं तर स्वातंत्र्य हा त्याचा हेतु आहे. सध्यां मनुष्य हा अर्धवट स्वतंत्र आहे. पहिल्या काळांत त्याला मुळींच स्वातंत्र्य नव्हतें. त्या काळीं एक मनुष्य दुस-या मनुष्याला आपल्या मालकीचा करूं शके हा शरीरावरील मालकी हक्क नाहीसा झाला आहे. दुस-या काळांत मनुष्यें जरी स्वतंत्र होतीं तरी मनुष्याच्या श्रमावर जमीनदारांचें स्वामित्व होतें, हेंही आतां नाहीसें झालें आहे. आपला श्रम पाहिजे त्या माणसास विकण्याचा हक्क त्याला हल्ली आहे; परंतु त्याचें स्वातंत्र्य अजून पूर्ण झालें नाहीं. कारण, निवळ श्रम संपत्ती उत्पन्न करण्यास असमर्थ आहे. त्या श्रमाला साधने व उपकरणें यांची जोड पाहिजे. परंतु हीं साधनें व उपकरणें भांडवलवाल्यांच्या ताब्यांत असतात व म्हणूनच कामकरी भांडवलवाल्यांच्या तावडींत सांपडतात व त्यांना भांडवलवाले देतील ती मजुरी पतकरणें भाग पडतें. सामाजिक पंथाचें असें म्हणणे आहे कीं, उत्पत्तीचीं हीं साधनें व उपकरणें खासगी व्यक्तीच्या मालकीचीं नसावींत तर तीं समाजाचीं असावीत. अर्वाचीन काळीं संपत्तीची उत्पत्ति ही सामाजिक झालेली आहे. भांडवल व श्रम परस्परावलंबी आहेत. परंतु संपत्तीची वांटणी मात्र व्याक्तीक पद्धतीची आहे. हल्लीची समाजांतील संपत्तीची वांटणी ही अन्यायाची आहे हे लॅझेलीीनें रेकॉर्डच्या खालील दोन तत्वावरून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. रिकार्डेाच्या मतें पदार्थाचें मोल हें शेवटं श्रमावर अवलंबून आहे. अमुक तासाचा अमुक श्रम म्हणजे पदार्थाचें मोल होय. समाजाला अवश्य श्रम म्हणजेच मोल होय. म्हणून शारीरिक व मानसिक श्रमाला संपत्तिच्या उत्पत्तीबद्दल सर्व मोबदला मिळाला पाहिजे. परंतु हल्लीच्या औद्योगिक पद्धतींत श्रमाचा मोबदला ठरलेला असतो. निवळ उपजीविकेला जितका खर्च लागतो त्यांपेक्षां जास्त मजुरीचा दर वाढणें अशक्य आहे. कारण, जर मजुरी वाटली तर लग्ने जास्त होतील व त्यानें लोकसंख्या वाढेल व शेवटीं मजुरीचा दर पूर्वपदाला येईल. अभिमत पंथानें सांगितलेला हा जो मजुरीचा निवृण कायदा त्या