पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ૨૨ ] हरकत नाहीं. या काळांत श्रमाला आपले सर्व हक्क परत मिळतील व ते समाजाकडून कबूलही केले जातील. कामकरी लोक हे समाजांतील एकदर लोकसंख्येच्या शेंकडा ९६ प्रमाणांत असतात तेव्हां त्यांचेंच खरोखरी राष्ट्र होतें. ते राष्ट्रांतील एक वर्ग नव्हेत. म्हणून जेव्हां राजकीय सत्ता कामदारांच्या हातांत येईल तेव्हां ती सर्व राष्ट्राच्या हातांत गेल्याप्रमाणें होईल. पहिल्या दोन काळांत अप्रत्यक्ष कराची पद्धति होती. आपल्या बरोबरीनें कामदारांच्या डोक्यावर कराचा बोजा बसवावयाकरितां श्रीर्मिती वर्गाची ही युक्ति होती. परंतु आगामी कामदारांच्या काळांत कर प्रत्येक वर्गाच्या ऐपतीप्रमाणेंच ठरविण्यांत येतील. वरवर्णिलेेल्या प्रत्येक काळांत राष्ट्राच्या उद्देशाची कल्पना भिन्न भिन्न आहे. पूर्व काळीं अशी कल्पना होती कीं, सरकारचें कर्तव्यकर्म म्हणजे मानवी स्वातंत्र्य व मालमत्ता यांचें संरक्षण करणें एवढेंच होय. दुस-याच्या व्यवसायापणाला प्रतिबंध न होतां प्रत्येक व्यक्तीला जितका स्वतंत्रपणे व्यवसाय करतां येईल, तितका करण्यास मुभा देणें इतकेंच सरकार कर्तव्यकर्म अशी दुस-या काळची कल्पना होती. या कल्पनेप्रमाणे दुर्बल हे प्रबलांच्या तावडीत जातात. कामकरीकाळांतील सरकारंच्या कर्तव्यकर्माची कल्पना अगदी भिन्न आहे. प्रत्येक व्यक्तीला अज्ञान विपत्ति, दारिद्य व दुर्बलता या सर्वांवर विजय मिळवितां यावा अशी योजना करणें हे सरकारचें खरें कर्तव्यकर्म आहे अशी या कामकरी काळाची कल्पना आहे. सारांश, अर्वाचीन काळच्या प्रयत्नाचा गुरुकिली म्हणजेच प्रगतीची कल्पना होय प्रत्येक युगाची एक प्रधान कल्पना असते व हल्लीच्या काळची प्रधान कल्पना म्हणजे मानवीजातीची नैतिक उनत्ती हि होय. पहिल्या काळच्या शेवटी गुलामगिरी अथवा एका मनुष्यप्राण्याचा दुस-या मनुष्यप्राण्यावरील स्वत्वाचा हक्क नाहीसा झाला; म्हणजे या काळांत मानवी स्वातंत्र्य हा एक नैसर्गिक हक्क आहे असें सिद्ध झालें. नागरिक काळांत मनुष्याचा ज्ञान मिळविण्याचा हक प्रस्थापित झाला; म्हणजे लोकशिक्षण हे सरकारचे कर्तव्य समजलें गेलें. व आतां कामकरीकाळांत मजुरांचा मालमत्तेवरील हक्क प्रस्थापेित व्हावयाचा आहे. मनुष्याला वाटेल तें करण्याचा हक्क असल्याशिवाय, त्याला ज्ञान मिळविण्याचा हक्क असल्याशिवाय व