पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२५० ] सर्व ग्रामस्थांच्या मालकीची असे. परंतु या प्रत्यक्ष प्रयत्नाचा इतिहास येथें देणें शक्य नाही. अर्वाचीन काळीं अर्थशास्त्रांत जे सामाजिक पंथ निघाले आहेत त्यांचा संक्षित इतिहास येथें देणें शक्य आहे व त्यायोगानें प्रास्ताविक पुस्तकांतील उपोद्धात व हा भाग मिळून अर्थशास्त्राचा सर्व इतिहास दिल्यासारखें होईल. वर सांगितलेंच आहे कों, सामाजिक पंथ हा शब्दप्रयोग प्रथमत : ओवेन या इंग्रज समाजसुधारकाच्या प्रयत्नासंबंधीं लावण्यांत आला. तेव्हां आपल्या इतिहासाला तेव्हांपासूनच प्रारंभ करणें बरें. रॉबर्ट ओवेन हा मोठा सुधारक होता. त्याचे स्वतःचे कारखाने होते; त्यांत त्यानें पोरक्या मुलांना कामाला लावून त्यांच्या आरोग्याकडे व शिक्षणाकडे लक्ष घातलें. गिरणींतील मजुरांना शिक्षण देण्याकरितां रात्रीच्या शाळा काढण्याची कल्पना त्याची होय. त्यानें कारखान्याचे कायदे घडवून आणण्यांत पुष्कळ खटपट केली व आपली सर्व संपत्ति मजूरलोकांची स्थिति सुधारण्यांत व त्याच्या कल्पनेप्रमाणें एक सामाजिक पंथी संस्था स्थापण्यांत घालविली. त्याची सामाजिक पंथी कल्पना कांहींशी ग्रामसंस्थेसारखी होती. त्याचें म्हणणे असें होते कीं, सुमारें १२०० लोकांनी सुमारे १२०० किंवा १८०० एकर जमीन घ्यावी व आपला एक समाज करावा. या समाजानें एकाच इमारतींत रहावें व सर्व जमिनीची लागवड समाईकश्रमानें करावी व आपल्या श्रमाचे उत्पन्नाचाही त्यांनीं एकत्रच उपभोग घ्यावा. फोरिअर व सेंट सायमन यांच्या योजना याच तऱ्हेच्या होत्या. फारिअरच्या मतामध्यें सर्व समाजाच्या लहान टोळ्या बनवाववाच्या. प्रत्येक टोळीनें एकाच मोठ्या इमारतींत रहावयाचें. या टोळीचा मुख्य धंदा शेतकीचा. परंतु आवडीप्रमाणें दुसरेही धंदे करण्यास हरकत नाहीं. या टोळींत खासगी मिळकत व कुटुंबव्यवस्था असावयाची. परंतु श्रीमंत व गरीब यांनीं एकत्र रहावयाचें. म्हणजे श्रीमंत व गरीब यांमधील हल्लीचा भेदभाव राहणार नाहीं. सर्वाच्या श्रमानें उत्पन्न झालेल्या संपत्तीचा एक ठरीव हिस्सा प्रत्येक मनुष्याला मिळावयाचाच व बाकीच्या उत्पन्नांक पांचचारांश श्रमाबद्दल मोबदला श्रम करणारांस द्यावयाचा. चार-बारांश भांडवलाबद्दल भांडवलवाल्यांस यावयाचा व तीनबारांश बद्धिमत्ता कल्पकता हे गुण दाखविणा-या लेाकांना द्यावयाचा. या योजने