पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/255

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[ ૨૪૨ ] लेली होती, त्यासंबंधांत प्रथमतः हा शब्द वापरण्यांत आला व तो ताबडतोब एक पारिभाषिक शब्द बनला. कारण अर्थशास्त्राच्या वाढीमध्यें कांहींएक विशिष्ट प्रकारच्या कल्पना-संपत्तीच्या, उत्पत्तीबद्दलच्या व संपत्तीच्या वांटणीबद्दलच्या-खटपटी व प्रयत्न सुरू झाले होते. या कल्पना व हे प्रयत्न यांमध्यें बरेंच साम्य होतें.तेव्हां अशा या सारख्या कलाच्या कल्पनांना व प्रयत्नांना एका सामान्य नांवाची जरूरी होती व यामुळे सामाजिक पंथ हें नांव प्रथमतः निघाल्याबरोबर भाषेत भासणारी एक उणीव नाहीशी होऊन हा शब्द सर्वत्र एकदम प्रचारांत आला व यासंबंधींच्या वाड्मयाची सामाजिक पंथ या नांवाची अर्थशास्त्राची एक स्वतंत्र शाखा बनली असें आतांच सांगितले आहे. जरी वर निर्दिष्ट केल्याप्रमाणें सामाजिक पंथ हा शब्द प्रचारांत येऊन तो सर्वतोमुखीं झाला, तरी पण या शब्दाच्या व्याख्येसंबंधीं मात्र एकमत झालें नाहीं. कारण अर्थशास्त्रामध्ये जे विशेष विचार निघाले होते व ज्या खटपटी चालल्या होत्या त्या एक प्रकारच्या भासत ख-या व म्हणूनच त्या सर्वांचा समावेश करण्याकरितां एका शब्दाची जरूरी होती खरी; तरी पण शब्दप्रयोग ठरल्यावर त्याचा अर्थ काय हा बिकट प्रश्न राहिलाच. व या शब्दाच्या निरनिराळ्या व्याख्या निरनिराळ्या लोकांनीं दिल्या. कारण ज्या लेखकाला जी पद्धति श्रेयस्कर वाटली ती पद्धति ज्यामध्यें अन्तर्भूत होईल अशा प्रकारची व्याख्या ती सामाजिक पंथाची व्याख्या म्हणून त्यानें दिली; व यायोगानें सामाजिक पंथाचे निरानराळे प्रकार बनले. तेव्हां सामाजिक पंथाच्या कल्पनांची माहिती होण्याकरितां या पंथाच्या निरनिराळ्या शाखांचें व्यवस्थित वर्गीकरण करणें इष्ट आहे. कारण मग त्यांचें क्रमानें वर्णन करतां येईल. व अशा वर्गीकरणाकरितां सामाजिक पंथाची सर्वात व्यापक व्याख्या घेणें इष्ट होईलू औद्योगिकक्रांतीचा परिणाम समाजांत सांपत्तिक विषमता उत्पन्न करण्यांत झाला व ही तीव्र विषमता लोकांस अन्यायाची वाटू लागली. तेव्हां समाजांतील संपत्तिची वांटणी समतेच्या तत्वावर घडवून आणण्याच्या बुद्धीनें-निदान समाजातील विलक्षण विषमता कमी करण्याच्या बुद्धीनें-समाजाच्या चालीरीतींमध्यें व औद्योगिक व्यवस्थेमध्यें जे फेरफार