पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/248

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[ २३८ ] मतः भासतो. परंतु सहकारी पतपेढ्यांच्या तत्वानें हा बिकट प्रश्न सोडविला व म्हणून या तत्वाला इतकें विलक्षण महत्व आलेलें आहे. सहकारी पतपेढ्यांचें रहस्यसुद्धां संघशक्तींत आहे. जरी एकएकटया शेतक-याला किंवा कामदाराला पत नसली तरी असे पुष्कळसे शेतकरी व कामदार एकत्र झाले व सर्वांच्या कर्जाची सर्वांनीं अमर्यादित जबाबदारी घेतली ह्मणजे या संकलित संघाची पत पुष्कळच वाढते व मग अशा संघाला हलक्या व्याजानें कर्जाऊ पैसे मिळतात. यामुळेंच या पेढ्यांमध्यें-निदान एका प्रकारच्या पेढ्यांत तरी-अमर्यादित जबाबदारीला फार महत्व दिलें जातें. ज्याप्रमाणें सहकारी दुकानाच्या यशाचें खरें रहस्य रोखीच्या पद्धतींत आहे, त्याचप्रमाणें असल्या लहान पेढ्यांच्या यशाचें रहस्य अमर्यादित जबाबदारींत आहे म्हणून स्काट्सडेलीच याचा या अमर्यादित जबाबदारीवर फार रोंख आहे. हल्लींच्या काळीं या तत्त्वावरील पुष्कळ पेढ्या मर्यादित जबाबदारीच्या असतात हें खरें; व रफेसिन यानें काढलेल्या पेध्यंत पहिल्यापसून अमर्यादित जबाबदारीवर भार न ठेवतां त्या मर्यादित जबाबदारीवर काढल्या जात असत; तरी पण सहकारी पतपेढ्यांच्या यशाचें एक मुख्य कारण अमर्यादित जबाबदारी होय हें निर्विवाद आहे. दुसरें यशस्वीपणाचें कारण सभासदांची योग्य निवडणूक हें होय. आतां आपण अशा एखाद्या सहकारी पतपेढीचें सामान्य वर्णन देऊं म्हणजे त्याचें स्वरूप सहज ध्यानांत येईल. समजा तुह्मांला एका खेडेगांवांत अशी एक पेढी स्थापन करावयाची आहे. तर अशा खेड्यांत जाऊन शेतकर्याची एक सभा भरवून त्यांना या पेढ्यांचें महत्त्व वर्णन करून त्यांचें मन अशी पेढी काढण्यास तुम्हीं वळविलें म्हणजे पांचपंचवीस लोक मिळून अशा पेढीची संस्था स्थापन करतात. या संस्था पूर्णपणें प्रातिनिधिक तत्वांवर चालवावयाच्या असतात व ही गोष्ट फारं इष्टही आहे. सभासद आपल्यामधून एक सेक्रेटरी, एक अध्यक्ष व एक कमिटी नेमतात. पेंढीचें भांडवल सभासदांकडून अगदीं लहान लहान भागांनीं जमवितात. ह्मणजे दर महिन्यास चार अाण्यांचाही हप्ता असतो व प्रत्येक भाग १ रुपयाचा असतो. प्रत्येक माणसानें कांहीं एका ठराविक संख्येपेक्षां जास्त घेतां कामा नये असा नियम असतो. याचा उद्देश पेढी एका श्रीमंत माणसाच्या ताब्यांत