पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/244

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२३४]

वर्गामध्यें शिक्षणाचा प्रसार झालेला नाहीं, यामुळें स्वत:च्या प्रयत्नांनीं आपली स्थिति सुधारण्याची कल्पना या वर्गांत शिरली नाही. त्यांतल्यात्यांत मुंबईतील गिरण्यांमधील मजूर व कामदार हे बरेच पुढें आलेले आहेत व त्यांच्यामध्यें थोडीशी जागृति होऊं लागली आहे व म्हणून मुंबईत मजुरांच्या संघाचा नुकताच उपक्रम झालेला आहे. या मजूरसंघाच्या वतीनें एक सुशिक्षित गृहस्थ युरोपांतील व अमेरिकेंतील मजूर लोक यांची स्थिति अवलोकन करण्यास व तेथील मजुरांच्या संस्था यांची व्यवस्था ' चक्षुर्वै सत्यं ' या न्यायानें पाहण्याकरितां गेले आहेत ही अभिनंदनीय गोष्ट आहे. परंतु अशा संस्थांची वाढ मजुरांमध्यें शिक्षणाचा प्रसार अधिक झाल्यावांचून होणार नाहीं व हा प्रसार होण्यास प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचें झालें पाहिजे. म्हणजे पुढल्या पिढीतील मजूरवर्ग प्राथमिक शिक्षणाचा तरी लाभ मिळालेला असेल व मग त्यांना अशा संस्थांची अवश्यकता भासूं लागेल.

भाग पंधरावा.


सहकारी पतपेढ्या.


 मागील दोन भागांत ज्या संस्थांची माहिती दिली त्या संस्था व तीं तत्वें औद्योगक बाबतींत फार पुढे गेलेल्या इंग्लंड देशामध्यें प्रायः प्रादुर्भूत झालेलीं आहेत. कारण इंग्लंडमध्यें शेतकीत काय किंवा उद्योगधंद्यांत काय प्रचंड प्रमाणावरील पद्धति पूर्णपणें अंमलात आलेली आहे. या भांडवलाची अवश्यकताच फार असते. इंग्लंड या देशाला युरोपांतील इतर देशांच्या आधीं औद्योगिक वर्चस्व आल्यामुळें तेथें संपत्तीची खूप वाढ होऊन भांडवलास जसा कांहीं पूर आला होता व इंग्लंड जगांतील बहुतेक देशांना भांडवल पुरवूं लागलें होतें. प्रचंड प्रमाणावरील पद्धतींत कारखानदार व मजूर यांचेमध्यें फार मोठा भेद उत्पन्न