पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/241

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२३१]

व हुरूपानें काम करून जो जादा नफा-दररोज ८॥पेन्सांप्रमाणें म्हणजे दरवर्षास ११ पौंडांचा होतो तो सर्व तुम्हांस मिळेल.मात्र तुम्हीं तो स्वतःच्या मेहनतीनें व श्रमानें मिळविला पाहिजे. मजुरांना खात्री पटण्याकरितां जागच्या जागेवर त्यानें ४४ मजुरांना-ज्यांचें काम फार काळजीपूर्वक, कळकळीनें व काटकसरीनें झाले होतें त्यांना-गेल्या सालाबद्दल त्यांनीं कमावलेला जादा नफा वांटून दिला. या लेक्लेअरच्या परोपकारी कृतीनें सर्व मजुरांचा त्यावर विश्वास बसला व त्यांना रंगविण्याचा कारखाना आपला असा वाटूं लागला व तेव्हांपासून लेक्लेअरच्या कारखान्याची विलक्षण भरभराट झाली. या पद्धतीनें मजुरांचा फक्त फायदा झाला असें नाहीं तर रंगाच्या कारखान्याचा मालक जो लेक्लेअर त्याचाही फार फायदा झाला. त्याच्या कारखान्यामध्यें देखरेखीचा खर्च फार कमी येऊं लागला. शिवाय त्याचे घरें रंगविण्याचें काम इतर धंदेवाल्यांपेक्षां पुष्कळच सुबक व टिकाऊ होऊं लागले. यामुळे याचेकडे गि-हाइकांची अतोनात गर्दी होऊं लागली. लेक्लेअरनें मात्र नफ्याच्या वांटणीचा हा क्रम अव्याहत चालविला; पुढें लेक्लेअरच्या कारखान्यांतील मजुरांनीं एक परस्परसाहाय्यकारीमंडळी स्थापन केली व त्यांतून काम करण्यास वयामुळे नालायक झालेल्यास पेन्शन देण्याची व्यवस्था केली. तसेच एखादा मजूर आजारी पडला तर त्याला कांहीं वेतन देण्याची व्यवस्था झाली. लेक्लेअरच्या उत्तेजनानें मजुरांच्या सुधारणेच्या आणखी पुष्कळ बाबी या संस्थेनें हातीं घेतल्या. पुढें या संस्थेच्या इतर शहरांतून शाखा निघाल्या. सारांश, ज्याप्रमाणें रॉचडेल पायोनिअर्स विणकरांची संस्था लहान प्रमाणावर सुरू होऊन पुढे मोठी अवाढव्य संस्था बनली; तसेंच लेक्लेअरच्या साध्या रंगांच्या धंद्याचेंही झाले व एवढ्या प्रचंड धंद्याचें काम इतक्या सुबक त-हेनें व व्यवस्थित त-हेनें चाले कीं, लेक्लेअरच्या पश्चातही या रंगाच्या कारखान्याचा लौकिक सारखा कायम राहिला व त्याच्या भरभराटींत रतिभरही कमीपणाही आला नाहीं.
 हें नफ्याच्या वांटणीचें तत्वही पुष्कळ धंद्यांत पसरलें. या तत्वानें भांडवल व श्रम यांच्यामध्यें सलोखा राहून श्रम करणा-या माणसांना हौशीनें व हुरूपानें काम करण्याची बुद्धि होते. प्रचंड कारखान्याच्या पद्धतीचा हा एक मोठा दोष आहे कीं, त्यामध्यें मजूरवर्ग याचें कारखा-