पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/240

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २३० ]

असे भिन्न भिन्न वर्ग नसतात. तर मजूर आपल्याच भांडवलावस् आपल्याच मार्फत कारखाने चालवितात. सारांश, ज्या कारखान्यांतील मजूर व मालक एक आहेत, म्हणजे मजुरांना मजुरीखेरिज कारखान्याच्या नफ्यापैकींही हिस्सा मिळतो असे कारखाने सहकारी तत्वावर काढलेले कारखाने होत. परंतु उत्पत्तीच्या वेळीं हल्लीच्या काळीं कारखानदारांमध्यें किती मानसिक, नैतिक वगैरे गुण पाहिजे असतात हें मागें दाखविलें आहे, त्यावरून कारखान्यांतून भांडवलवाले काढून टाकतांयेतील;परंतु कारखानदार काढतां येणार नाहींत. कारण त्यांच्या देखरेखीशिवाय प्रचंड कारखान्याचें यंत्र बंद पडेल.मजुरांनीं सहकारी तत्वावर काढलेले कांहीं उत्पादक कारखाने चांगल्या त-हेनें चालले आहेत हें खरें तरी पण ही गोष्ट अपवादादाखल आहे. तरी पण एकंदरींत सहकारित्वाच्या तत्वाला या उत्पादनांच्या बाबतींत ह्मणण्यासारखें यश आलेलें नाहीं व यश येणें शक्यही नाहीं, हेंमागील विवेचनावरून दिसून येईल. संपत्तीच्या वांटणीमध्यें मात्र हें तत्व फार फायदेशीर आहे व त्यापासून हितकर परिणाम झालेले आहेत ही निर्विवाद गोष्ट आहे.
 हल्लीच्या कारखान्यांच्या पद्धतीमध्यें मजुरांना कारखान्यांत मनापासून व हुरूपानें काम करण्यास विशेष हेतु नसतो. कारण त्यांची मजुरी करारानें ठरलेली असते.शिवाय कारखाने आपले असें मजूरवर्गास वाटत नाहीं. हल्लींच्या प्रचंड कारखान्याच्या पद्धतींतील हे दोष नफ्याच्या वाटणीच्या पद्धतीनें नाहीसे केलेले आहेत. तेव्हां या नफ्याच्या बांटणीच्या पद्धतीचें थोडक्यांत याच भागांत विवेचन करणें ठीक होईल.
 ज्याप्रमाणें सहकारितेची कल्पना काढण्याचा मान इंग्लंडास येतो त्याप्रमाण नफ्याच्या वांटणीच्या पद्धतीच्या शोधाचा मान फ्रच लोकांकडे जातो.फ्रान्सामध्यें लेक्लेअर यानांवाचा घरें रंगविणारा होता. त्याचा धंदा पॅरिस शहरीं होता. तो आपल्या धंद्यांत ३०० मजूर लावीत असे. त्यानें असें पाहिलें कीं, मजूर हे निष्काळजी व बेपर्वा असतात. हें काम जर ते काळजीनें, कळकळीने व हुरूपानें करतील तर त्यांच्या या जास्त कर्तबगारीनें दररोज ६ पेन्सांचा नफा होईल व हत्यारें व रंगादिक माल यांची नासधूस व व्यर्थ खर्च केला तर २॥पेन्स दररोज वांचतील असें त्यानें आंकड्यांवरून अनुमान काढले व सर्व जादा फायदा मजुरांस देण्याचें ठरविलें. असा विचार करून त्यानें १८४२ मध्यें आपला बेत मजुरांस सांगितली. काळजीनें