पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/236

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२२६]

 तसेंच कारखान्यांबद्लच्या कायद्यांची अंमलबजावणी होत आहे किंवा नाहीं यावर देखरेख करण्याचें काम व या कायद्यांचें कोठें उल्लंघन होत असल्यास ती गोष्ट सरकारी अधिका-यांच्या नजरेस आणण्याचें कामही या संघांच्या संस्थेच्या हातून चांगल्या प्रकारें होतें व हि गोष्टही मजुरांच्या फारफायद्याची आहे.
 येथपर्यंत मजूरसंघाचे औद्योगिक व सांपत्तिक फायदे सांगितले व मजूरसंघाच्यायोगानें मजुरांमध्यें काटकसर इत्यादि गुण कसे वाढतात हें दाखविलें. परंतु मजूरसंघानें मजुरांची एकंदर दानत कशी सुधारते व त्यांचे बौद्विक गुण कसे वाढतात तें आतां पहावयाचें आहे.
 कांहीं संघ आपल्या सभासदांकरितां शिक्षणविषयक सोयी करितात. उदाहरणार्थ, सभासदांकरितां व्याख्यानें करणें, पुस्तकसंग्रह जमविणें वगैरे प्रत्यक्ष शिक्षणाची कामें कांहीं संघांनीं हाती घेतली आहेत. परंतु या संघांचा अप्रत्यक्ष फायदा फार मोठा आहे. आधीं या संघाचा सभासद झाल्यांनें ठरलेले नियम व शिस्त पाळणें, आपल्या पुढा-यांना मान देऊन त्यांवर निष्ठा ठेवणें, सभासदांमधील एकमेकांवर विश्वास ठेवण्यास शिकणें वगैरे गुणांचा मजुरांत विकास होते व मोठमोठ्या संघांचें काम यशस्वी तऱ्हेने चालविल्यानें मजुरांतील पुढ्यांत कार्यकुशलता उत्पन्न होते व यायोगें म्युनिसिपालिटी, कौन्टीकौन्सिल व त्यापेक्षांही जबाबदारीचीं कामें करण्याची शक्ति मजुरवर्गातील लोकांस येते. याचें प्रत्यंतर इंग्लंडच्या हट्टींच्या पार्लमेंटाववरून दिसून येतें. त्यामध्यें मजूरवर्गातील लोक प्रधानाच्या पदवीप्रत पोंचल्याची उदाहरणें आहेत.
 सारांश, मजूरसंघ हें मजुरांचें एक स्थानिक स्वराज्यच आहे व या राजकीय शाळेत त्यांना राजकीय शिक्षणाचे, व्यापारी शिक्षणाचे व कार्यकुशलतेचे पाहिले धडे शिकतां येतात व यापासून मजूरसुद्धां प्रजासत्ताक राज्यांतील जबाबदारीचीं कामें अंगावर घेण्यास पात्र होतात.
 याप्रमाणें मजूरसंघापासून मजूरवर्गाची सांपनिक, राजकीय, नैतिक व सामाजिक अशा सर्वांगांनीं उन्नति झाली आहे व आणखीही होत राहील, यांत शंका घेण्याचें कारण नाही.
 मजूरसंघाच्या कांहीं कांहीं नियमांनीं उद्योगधंद्याच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होण्याची भीति आहे व अशा रीतीनं उद्योगधंद्यास धक्का पोंचला