पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/234

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२२४]

पाहिजे काय ? आंकड्यांवरून संघाच्या संस्थेपासून इंग्लंडांत मजुरी वाढली आहे असें दिसतें; परंतु संघाच्या विरोधकांचें असें ह्मणणें आहे कीं, या काळांत इंग्लंडामध्यें धंद्याची भरभराट असल्यामुळे मजुरी वाढली आहे; ती संघाच्या परिश्रमानेंच वाढली आहे असें ह्मणण्यास सबळ आधार नाहीं. परंतु याला प्रत्युत्तर असें आहे कीं, ज्या धंद्यांत संघाचा प्रसार पुष्कळ झाला आहे त्याच धंद्यांत मजुरी वाढली आहे व ज्या धंद्यांत संघाचा प्रसार नाहीं तेथें मजुरी वाढली नाही. या प्रत्यक्ष अनुभवावरून असें म्हणणें प्राप्त आहे कीं, संघाच्या परिश्रमानें मजुरींत थोडी तरी वाढ झाली असली पाहिजे. तात्विकदृष्ट्या विचार करतां संघानें मजुरीत थोडीतरी वाढ झालीच पाहिजे. कारण मजुरांच्या संघामुळे कारखानदार लोकांवर एक प्रकारचा दाब राहतो. नवशिक्या माणसाला धंद्यांत घेतला जात नाहीं. तसेंच कामासंबंधीं पुष्कळ नियम हे संघ करतात व आपल्या सभासदांना पाळावयास लावतात; यामुळें ही मजुरांची कर्तबगारी वाढते व संपत्ती जास्त उत्पन्न झाल्यानें मजुरांना त्याचा थोडासा वांटा मिळतो शिवाय संवादि कृत्रिम उपायांनीं व प्रयत्नांनीं मजुरी वाढणें शक्य नाहीं हें विधान ' 'मजुरीफंडा' च्या कल्पनेवरून काढलेलें आहे व मागें आपण या कल्पनेंतील खोटेपणा दाखविला आहे; त्यावरून मजुरांच्या परिश्रमानें नफ्याचा कांहीं भाग मजुरांस मिळणें शक्य आहे. कारण एकएकटा मजूर चढाओढीत चिरडला जातो व कारखानदार फार नफा मारतात. परंतु संघाच्या योगानें त्यांना चढ़ाओढिंत जास्त शक्ति येते व म्हणून मजुरांना किंफाईतशीर करार करून घेता येतात. तेव्हां संघापासून मजुराच्या वाढींच्या बाबतीत मजुरांचा कांहीं तरी फायदा होतो असें म्हणणें भाग आहे .
 मजुरी कायम ठेवण्याच्या अगर वाढविण्याच्या हेतूइतकाच मह तत्वाचा उद्देश कामाचे तास कमी करून घेण्याचा आहे व याही बाबतीत मजुरांचे संघ आपला हेतु प्रथमतः सामोपचारानें, विनंतीने व सलोख्यानें घडवून आणण्याचा प्रयत्न करतात व हे सर्व प्रयत्न निष्फळ झाले तर संघाचा विचार करतात . व याही बाबतींत असें दाखविण्यास पुष्कळ पुरावा आहे कीं, गेल्या तीस चाळीस वर्षांत इंग्लंडमध्ये कामाचे तास सारखे कमी होत आहेत व ही गोष्ट मजुरसंघांच्या श्रमाने घडन आलीं