पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/233

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २२३ ]

साक्षीदारांनीं परस्परविरोधी असा पुरावा दिला आहे. परंतु एकंदरींत या संघांपासून पुष्कळ हित झालें आहे असा सामान्य अभिप्राय त्या कमिशननें दिला व त्यामुळें या संस्थेला तेव्हांपासून जोर आला. आतां आपण वर निर्दिष्ट केलेल्या आक्षेपांचा थोडक्यांत विचार करूं.
 प्रथमतः संप व संघ यांचा संबंध काय आहे हें पाहिलें. संघाच्या संस्थांनीं संप वाढले किंवा कमी झाले? ही गोष्ट निवळ अांकडयांनीं शाबीद करणें कठिण आहे. प्ररंतु अांकडयांवरून जर कांहीं शाबीद होत असेल तरते हें कीं, संघाच्या योगानें संपाची संख्या कमी झाली आहे . आपले संप जुटीच्या अभावानें न मोडावे व ते यशस्वी करतां यावे अशा उद्देशानें हे संघ निघाले हें खोटें नाहीं. तेव्हां संघाचा उद्देशच जर संप करण्याचा आहे तर संघांनीं ते संप वाढलेच पाहिजे असा कोटिक्रम कोणी पुढें आणील; परंतु तो वस्तुस्थितीस धरून नाहीं असें दिसून येईल. सामादि सर्व मार्ग खुंटले म्ह्णजे संप करावयाचा असा संघाचा नियम आहे. परंतु संघाच्यायोगानें असे प्रसंगच कमी येतात. कारण ज्यांच्यामध्यें व्यवस्थित रचना नाहीं अशा बाजारबुणग्यासारख्या मजुरांशीं कारखानदारांना वाटाघाट करतां येणें कठिण असतें व अशा स्थितींत मजुरांचें समाधान होत नाहीं. परंतु संघासारखी संघटित व्यवस्था असली म्हणजे कारखानदारांना संघाच्या कामदारांशीं शांतपणें वाटाघाट करण्यास सुलभ जातें. शिवाय संघाचे प्रतिनिधी जे कामदार हे मजुरांच्यापेक्षां जास्त विचारी व शहृाणे असल्यामुळे आपल्या मागण्या कितपत वाजवी आहेत हें त्यांच्या ध्यानांत लवकर येतें. सारांश, या संघांनीं कारखानदार व मजूर यांमधील संबंधाचा बिघाढ झाला नाहीं इतकेंच नव्हे तर तो संबंध जास्त व्यवस्थेचा व जास्त हितकर झाला आहे असेंच झटलें पाहिजे. कारण कारखानदार व मजूर यांमधील दळणवळणास व गैरसमजाच्या नाशांस एक नवीन मार्ग निघाला तो मार्ग संघाची कमिटी होय. यामुळें हल्लीच्या काळीं पष्कळ तंत्र्याचा व तक्रारींचा निकाल सामोपचारानें व सलोख्यानेंच होतो. यावरून संघाची संस्था ही संपाची उत्तेजक नसून प्रतिबंधकच आहे यांत शंका नाही.
 आत दुसरा प्रश्न असा आहे कीं , संघाच्या संस्थांनीं मजुरांची मजुरी वाढली काय ? व या संस्थांचा परिणाम मजुरींच्या वाढींत झालाच