पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/232

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२२२]

असे कायदे करवून घेणें किंवा अस्तित्वांत असलेल्या कायद्यांत सुधारणा घडवून आणणें हा होय. या कामाकरितां परिषद दर वर्षास एक पार्लामेंटरी कमिटी नेमिते व पार्लमेंटांतील सभासदांना भेटून व इतर प्रकारची चळवळ करून मजुरांच्या गा-हाण्यांचा प्रश्न पार्लमेंटापुढें आणणें हें या कमिटीचें काम असतें. या परिषदेला प्रत्येक संघ आपल्या सभासदांच्या संख्येच्या मानानें कांहीं ठरीव प्रमाणावर आपले प्रतिनिधी पाठवितो. या परिषदेमध्यें अलीकडे सामाजिक पंथाच्या मतांची पुष्कळ छाप दिसून येऊ लागली आहे व संबाच्या कांहीं प्रतिनिधींनीं पुष्कळ सामाजिकपंथी कल्पनांचा स्वीकार केला आहे. परंतु एकंदरींत या संघामध्यें स्वावलंबनवाद लोक जास्त आहेत व म्हणून इतर देशांप्रमाणें इंग्लंडांत समाजपंथी लोकांचें फारसें बंड नाहीं.
 येथपर्यंत मजूरसंघाच्या स्वरूपाचें व त्यांच्या कामाचें विवचन केलं. आतां या संस्थांपासून मजूरवर्गावर काय काय परिणाम झाले आहेत व ही संघाची संस्था कितपत फायदेशीर आहे याचा विचार करावयाचा राहला.
 वर सांगितलेंच आहे कीं,इंग्लंडच्या जुन्या कायद्याप्रमाणें या संस्था बेकायदा होता व ते जुने कायदे रद्द झाल्यापासून हे संघ अस्तित्वात येऊ लागले व प्रथमतः या संघाबद्दल लोकांत बराच गैरसमज उत्पन्न झाला व या संघावर पुष्कळ प्रकारचे आक्षेप आले. या संघांनी मजूर व कारखानदार यांच्यामधील प्रेम व सलोखा नाहीसा होईल ;अशा तऱ्हेने कारखानदार व मजूर यांच्यातील संबंधांत बिघाढ झाल्यामुळे धंद्याचे नुकसान होऊन देशाची सांपत्तिक स्थिती खालावेल ;व शेवटी ज्या उद्देशाने हें संघ निघाले आहेत तो उद्देश म्हणजे मजुरीची वाढ व कामाच्या तासाचा संक्षेप कधींही सिद्धीस जाणार नाहीं ; हे व अशाच तऱ्हेचे आक्षेप या संघाविरुद्ध अशाच तऱ्हेचे आक्षेप या संघाविरुद्ध निघूं लागले; म्हणूनच या संघाच्या औद्योगिक व सामजिक परिणामांचें खरें स्वरूप काय आहे हें ठरवण्याकरीतां १८९८ चें कमिशन नेमण्यांत आलें .या कमिशनच्या रिपोर्टात या बाबतींत निश्चत अशीं विधानें सांपडत नाहीत. कारण