पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/231

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२२१]

संघाच्या कामदारांना पगार देतात किंवा ते मोफत काम करतात. संघाचा सर्व व्यवहार हे कामगार पहातात. कारखानदारांशीं मध्यस्थी करण्याचें काम कमिटीचें व त्यांतील कामगारांचें असते. कारखानदारांच्या व मजुरांच्या मतांत अंतर पडून तंट्याचें बीज सलोख्यानें मिटलें नाहीं तर मग संघ करण्याचा ठराव करणें हें काम कमिटीकडे असतें व ब-याच संघांत हें काम संघाच्या सर्व सभासदांच्या बहुमतावर अवलंबून असतें. परंतु संप बंद करण्याचा अधिकार कमिटीस असतो. संघाचें काम चालविण्याकरितां व संघाच्या निरानिराळ्या हेतूंच्या सिध्द्यर्थ संघाचें भांडवल जमवावें लागतें. हा पैसा प्रवेशफी व वर्गण्या यांपासून उत्पन्न करतात. या बाबतींत निरानराळ्या संघांच्या नियमांत पुष्कळ फेरफार दिसून येतो. प्रवेशफी कोठे पुष्कळ असते तर कोठे फार कमी असते. ६ पेन्सांपासून तों २ शिलिंगांपर्यंत व केव्हां केव्हां एक पौंडापर्यंतही प्रवेश फी असते. वर्गण्या दर आठवड्याच्या, पंधरवड्याच्या, महिन्याच्या किंवा तिमाही असतात व या बाबतींत संघासंघामध्यें पुष्कळ वैचित्र्य असतें. आठवड्याची वर्गणी १ पेन्सापासून दोन अडीच शिलिंगांपर्यंत असते. वर्गणी व प्रवेशफी गोळा करणें, ती पेढ्यांतून किंवा इतर ठिकाणीं सुरक्षितपणें ठेवणें, तिचा कमिटीच्या ठरावाप्रमाणें विनियोग करणें व त्यांतून सभासदांना मदत करणें हीं सर्व कामें कामदारांचीं असतात. शिवाय संघाचे फायदे मजूरवर्गास समजावून देणें व या तत्वाचा प्रसार करणें व संघाला नवीन नवीन वर्गणीदार व सभासद मिळवून आणणें इत्यादि कामें संघाच्या कामदारांना करावीं लागतात व म्हणून असे कामदार बहुधा भरपगारी लोक ( सभासदांपैकीच ) नेमलेले असतात.
 या संस्था इंग्लंडमध्यें आतां अगदीं बद्धसूल झालेल्या आहेत व त्यांचा प्रसार सर्व लहान मोठ्या धंद्यांत व कारखान्यांत व सरकारच्या व म्युनिसिपालिट्यांच्या निरनिराळ्या खात्यांच्या नोकरांत झालेला आहे; इतकेंच नव्हे तर या सर्व संघांची वार्षिक परिषदही भरविण्याचा प्रघात पडलेला आहे. अशी पहिली परिषद् १८६८ सालीं भरली होती व ती फार यशस्वी झाल्यापासून सालोंसाल सर्व संघांच्या प्रतिनिधींची एक परिषद इंग्लंडांतील एखाद्या शहरीं दर वर्षास भरते. या परिषदेचा उद्देश सर्व संघांच्या सामान्य हिताकडे लक्ष देणें व पार्लमेंटकडून आपल्याला अनुकूल