पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/229

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


भाग तेरावा


मजुरांचे संघ व त्यांची उपयुक्तता.


 " कलौ संघे शक्ती:" या संस्कृत म्हणीची सत्यता अर्वाचीन काळच्या औद्योगिक बाबतींत उत्तम रीतीनें दिसून येते कारण अर्वाचीन काळीं उद्योगाच्या कामीं रूढीचें, कायद्याचें किंवा चालीचें प्राबल्य नाहींसें झालें आहे व सर्व ठिकाणीं चढाओढीच्या तत्वाचा अंमल सुरू झाला आहे व या चढाओढीत व हल्लींच्या काळच्या तीव्र जीवनार्थकलहांत एकएकट्या व्यक्तीचा निभाव लागणें दुरापास्त झालें आहे. म्हणून सर्व वर्गामध्यें व धंदेवाल्यांमध्यें संघाची प्रवृत्ति दिसून येत आहे.
 मजुरांच्या संघाची संस्था ही इंग्लंडमध्यें प्रथमतः प्रादुर्भूत झालेली आहे. पूर्वी सांगितलेंच आहे की, प्रचंड कारखान्यांच्या पद्धतीनें इंग्लंडांत मजुरांचा मोठा समुदाय अस्तित्वांत आला व कारखानदार व मजूरदार यांच्यामध्यें औद्योगिक कलह उत्पन्न होऊं लागले व त्यामुळेच संपाचे प्रसंग वारंवार येऊं लागले. पुष्कळ वेळां एकोप्याच्या व जुटीच्या अभावामुळे संप सिद्धीस जात नाहीं हें मजुरांच्या ध्यानांत येऊं लागल्यापासून इंग्लंडांतील मजूर आपली स्थिती सुधारण्याकरितां जास्त व्यवस्थित तऱ्हेचे प्रयत्न करूं लागले व मजुरांच्या संघाची संस्था हें या प्रयत्नांचें दृश्यफल होय.
 आपल्या धंद्यांतील हिताच्या संरक्षणाकरतां व कारखानदारांशी असलेला आपला संबंध नियत करण्याकरितां स्थापन झालेल्या मजुरांच्या मंडळ्यांना मजुरांचे संघ म्हणतात. अशा प्रकारचे संघ इंग्लंडांत पूर्वी कायदेशीर नव्हते, परंतु १८२४|२५ मध्यें संघांचे प्रतिबंधक कायदे रद्द करण्यांत आले व तेव्हांपासून हे मजुरांचे संघ आस्तित्वांत येऊं लागले. व त्यांची फारच वाढ झाली.तेव्हां १८६७|६८ मध्यें या संस्थांची स्थिति पाहण्याकारितां एक कमिशन नेमलें गले व त्या कमिशनांतील अल्पसंख्या-