पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/228

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२१८]

होतात. परंतु एका संपाचा परिणाम कारखानदाराच्या व मजुरांच्या भावी संबंधांत चांगल्या त-हेनें दिसून येतो. ज्याप्रमाणें गुन्ह्याला शिक्षा दिली असतां घडलेल्या गुन्ह्यापासून व्यक्तीचें अगर समाजाचें झालेलें नुकसान भरून येत नाही; पण या शिक्षेचा असल्या गुन्ह्याच्या प्रतिबंधाला उपयोग होतो, त्याचप्रमाणें संपाचा कारखानदारांच्या भावी वर्तनावर सुपरिणाम होतो. आपण मजुरांच्या वाजवी मागण्या व गाऱ्हाणीं यांचा योग्य विचार केला नाहीं तर संप होईल ही भीति कारखानदारांना असते व या संपाच्या भीतीनें कारखानदार मजुरांच्या वाजवी मागण्यांचा योग्य विचार करून तंट्याचें मूळ वेळींच काढून टाकतात म्हणजे संपाचा प्रसंगच येत नाहीं. तेव्हां संपापामून जो कांहीं हितकर परिणाम होत असतो तो प्रत्यक्ष संपापासून न होतां त्याच्या भीतीपासून होतो असें म्हणणे प्राप्त आहे.
 सांपत्तिकदृष्ट्या हानिकर अशा संपांचा दुसरा सुपरिणाम मजुरांवर होतो. तो सुपरिणाम म्हणजे त्यांना सहकारित्वाच्या तत्वानें व एकजुटीनें कामें करण्याच्या तत्वाचें महत्व व फायदा कळू लागतो हा होय. औद्योगिक क्रांतीच्या अव्वल अमदानींत पुष्कळ संप झाले व त्यांपैकीं पुष्कळ निष्फळ झाले व हे निष्फळ होण्याचें कारण जुटीची व सहकारितेचा अभाव हाय असें मजुरांच्या ध्यानांत येऊं लागलें व जुटीची व सहकारितेची अवश्यकता त्यांना भासूं लागली व या जाणिवेचाच परिणाम पुढील दोन भागांत वर्णावयाच्या स्वावलंबी उपायांत झाला. तेव्हां संघांपेक्षा जास्त हितकर अशा उपायांचा विचार पुढील दोन तीन भागांत करुं.